शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचं फंडिग रोखण्यात पाकिस्तान नापास; गुणपत्रिका वाचाल तर पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 12:23 IST

पाकिस्तानची मार्कशीट एपीजीकडून जाहीर

नवी दिल्ली: फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सकडून पाकिस्तानचा समावेश पुन्हा एकदा ग्रे लिस्टमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यात पाकिस्तानला पूर्णपणे अपयश आलं आहे. आशिया पॅसिफिक गटानं दिलेल्या अहवालानुसार, दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारला ४० शिफारसी सुचवण्यात आल्या होत्या. यापैकी केवळ एक शिफारस पाकिस्ताननं पूर्ण केली आहे. आशिया पॅसिफिक गटानं (एपीजी) शनिवारी (काल) एक अहवाल प्रसिद्ध केला. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) बैठकीआधी सादर करण्यात आलेला एपीजीचा अहवाल महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एफएटीएफकडून पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये करण्यात आला. यानंतर पाकिस्तानला ४० कलमी कार्यक्रम देण्यात आला. यामध्ये अपयशी ठरल्यास तुमचा समावेश काळ्या यादीत केला जाईल, अशी तंबी पाकिस्तानला देण्यात आली होती. सध्या काळ्या यादीत इराण आणि उत्तर कोरियाचा समावेश आहे. दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी पाकिस्तानला ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या काळात आम्ही दहशतवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केल्याचं पाकिस्तान सरकारनं एफएटीएफला सांगितलं. मात्र सुचवण्यात आलेल्या एकूण ४० निकषांपैकी केवळ एक निकष पूर्ण करण्यात पाकिस्तानला यश आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. आता एफएटीएफची कारवाई रोखण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडे धाव घेतली आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद