शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:39 IST

Pakistan News: पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारींवर राजीनामा देण्यासाठी दबाव आहे.

Pakistan News: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीरला फील्ड मार्शलपदी बढती दिली. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या राजकारणात एक नवीन चर्चा किंवा वाद सुरू झाला आहे. असीम मुनीर राष्ट्रपती होऊ इच्छित असल्याने विद्यमान राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यावर राजीनामा देण्यासाठी खूप दबाव असल्याचा दावा केला जातोय. या वादावर आता स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया आली आहे.

शाहबाज शरीफ यांनी या दाव्याचे खंडन केले आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी कधीही राष्ट्रपती होण्याची इच्छा व्यक्त केली नाही किंवा त्यांनी अशी कोणतीही योजना आखली नाही, असे सांगितले. शहबाज शरीफ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी गुरुवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, शाहबाज शरीफ, आसिफ अली झरदारी आणि असीम मुनीर यांच्याविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेमागे परदेशी शक्तींचा हात आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्र्यांनी काय म्हटले?पाकिस्तानचे गृहमंत्र्यांनी सांगितले की, या खोट्या दाव्यांमागे कोण आहे, हे आम्हाला माहिती आहे. मी स्पष्ट केले आहे की, राष्ट्रपतींसोबत राजीनाम्याची कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा लष्करप्रमुखांची राष्ट्रपती होण्याची योजना नाही. पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी परदेशी एजन्सींद्वारे असे कट रचले जाताहेत, असा दावा त्यांनी केला.

असीम मुनीरचा कार्यकाळ वाढवलाजनरल असीम मुनीरला २०२२ मध्ये ३ वर्षांसाठी लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु नंतर शाहबाज सरकारने त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवला. गेल्या वर्षी आसिफ अली झरदारी यांना ५ वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती बनवण्यात आले होते. शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिल्याच्या बदल्यात त्यांना हे पद मिळाले. दरम्यान, आसिफ अली झरदारी हे बिलावल भुट्टो यांचे वडील आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयPresidentराष्ट्राध्यक्ष