शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान; पीटीआय उमेदवाराचा दारुण पराभव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 14:52 IST

Shehbaz Sharif Pakistan PM: शेहबाज शरीफ माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शाहबाज यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे.

Pakistan New Prime Minister: पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजकीय संकट आज अखेर संपुष्टात आले. पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे ज्येष्ठ नेते शेहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधानपदी निवड झाली आहे. रविवारी (3 मार्च 2024) मतदानानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शेहबाज शरीफ यांच्या रुपाने देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा शरीफ घराण्याच्या हाती गेले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते उमर अयुब खान यांनी शरीफ यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता.

कोणाला किती मते मिळाली?रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. शेहबाज यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर 100 हून अधिक मतांची आघाडी घेतली. शेहबाज शरीफ यांना एकूण 201 मते मिळाली, तर पीटीआयचे उमर अयुब खान यांना फक्त 92 मते मिळाली. यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शेहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शेहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीपीपी आणि एमक्यूएमसोबत युती पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यानंतर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने, पीपीपी आणि एमक्यूएम यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आज अखेर पाकिस्तानला नवे सरकार मिळाले आहे. विशेष म्हणजे, शेहबाज शरीफ, हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. शेहबाज शरीफ यापूर्वी एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. 

निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणीदेखील झाली होती. यामध्ये पीएमएल-एन पक्षाला 75, तुरुंगात कैद असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले 90 पेक्षा जास्त अपक्ष आणि पीपीपी पक्षाला 54 जागा मिळाल्या होत्या. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घातल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आज अखेर शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानElectionनिवडणूकPoliticsराजकारणNawaz Sharifनवाज शरीफInternationalआंतरराष्ट्रीय