शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पाकिस्‍तानात नोटाबंदी; लवकरच येणार नवीन नोटा, बँक ऑफ पाकिस्तानची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:37 IST

अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी आणि बनावट नोटांवर आळा घालण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

Pakistan New Currency Notes: पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तान मोठ्या रोखीच्या समस्येला तोंड देत आहे. याशिवाय, देशात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा वापर होतोय. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये 20 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणतात की, सुरक्षेचा विचार करुन नवीन नोटा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह जारी केल्या जातील. 

ते पुढे म्हणाले की, चलन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी नोटांचे डिझाइनदेखील बदलण्यात येणार आहे. नवीन नोटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रगत असतील, ज्यामुळे बनावट नोटा आणि त्यांच्यामध्ये स्पष्ट फरक करता येईल. याचा उद्देश पाकिस्तानची चलन प्रणाली, व्यवसाय आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. जुन्या नोटा एकदम बंद होणार नाहीत, पण त्यांच्या जागी हळूहळू नवीन नोटा आणल्या जातील. 

नोटांची नवीन सीरिज येणारपाकिस्तानमध्ये सध्या चलनात असलेल्या नोटा 2005 पासून जारी केलेल्या नोटांच्या बॅचच्या आहेत. या मालिकेत 20, 50, 100, 500, 1000 आणि 5000 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. मात्र आता पाकिस्तान सरकार नोटांची नवी मालिका आणणार आहे. नवीन फीचर्स असलेल्या नोटांचे स्कॅनिंग किंवा फोटोकॉपी करून बनावट नोटा छापल्या जाऊ नयेत म्हणून पाकिस्तान हे करत आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान हळुहळू चलनात असलेल्या जुन्या नोटा बाद करुन नव्या नोटा आणणार आहे.

नोटाबंदी का झाली नाही?स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा विश्वास आहे की, बनावट चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी होत आहे आणि त्यामुळे भूमिगत अर्थव्यवस्था प्रचलित झाली आहे. नवीन चलन छापून पाकिस्तानला या दलदलीतून बाहेर पडायचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सहजतेने पार पडावी, लोकांना नोटा बदलून घेताना कोणतीही अडचण येऊ नये आणि कोणत्याही आर्थिक घडामोडींवर परिणाम होऊ नये, हे लक्षात घेऊन नोटाबंदी अचानक केलेली नाही. नोटाबंदीपूर्वीच अर्थव्यवस्था आणखी खाली जाण्याची भीती आहे, त्यामुळे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने हळूहळू नवीन नोटा छापण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDemonetisationनिश्चलनीकरणInternationalआंतरराष्ट्रीय