शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी नौदलासोबत दिसली पाकची घातक अण्वस्त्रसज्ज पाणबुडी, भारताला घेरण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:11 IST

पाकिस्तान आणि चिनी नौदलांच्या या युतीमुळे भारताची चिंता देखील वाढू शकते.

पाकिस्तानी नौदलाने नुकतीच आपली एक पाणबुडी चिनी नौदलाच्या युद्धनौकाबरोबर कराचीत तैनात केली होती. उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानने चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी अगोस्टा-19 बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी तैनात केली होती. फ्रेंच बनावटीची ही पाणबुडी बाबर-3 आण्विक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज  आहे. पाकिस्तान आणि चिनी नौदलांच्या या युतीमुळे भारताची चिंता देखील वाढू शकते.'या' पाणबुड्यांचा पाकिस्तान आणि मलेशियन नौदलात समावेशयापूर्वी असा दावा केला जात होता की, चिनी युद्धनौकासह त्याची पाणबुडीही पाकिस्तानच्या कराची बंदरावर पोहोचली होती. आता चिनी युद्धनौकेच्या संरक्षणासाठी पाकिस्तानने आपली पाणबुडी तैनात केल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे. अगोस्टा-19 बी प्रकारची डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी फक्त पाकिस्तान आणि मलेशियाकडून आशिया खंडात चालविली जाते.पाकिस्तान चीनकडून 8 पाणबुड्या खरेदी करणारफोर्ब्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी नौदल आपली ताकद वाढविण्यासाठी चिनी डिझाइनवर आधारित टाइप 039 बी युआन क्लास पाणबुडी खरेदी करीत आहे. ही डिझेल इलेक्ट्रिक चिनी पाणबुडी पाकिस्तानच्या नौदलाची शक्ती वाढविण्यास सक्षम आहे. ज्यात अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. एअर इंडिपेंडेंट प्रपल्शन सिस्टीममुळे ही पाणबुडी कमी आवाज निर्माण करते. ज्यामुळे पाण्याखाली तिला शोधणे फार कठीण आहे.अगोस्टा-19 बी प्रकारच्या पाणबुड्या आण्विक हल्ला करण्यास सक्षमफ्रान्समध्ये बनविलेल्या पाच अगोस्टा-19 बी प्रकारच्या पाणबुड्या पाकिस्तानकडे आहेत. त्यापैकी तीनचे एअर इंडिपेंडेंट पॉवरमध्ये अपग्रेड करण्यात आले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या शस्त्रागारात या पाणबुड्या सर्वात शक्तिशाली आणि आधुनिक आहेत. या पाणबुड्या आधुनिक लढाऊ प्रणाली आणि एएस -39 एक्झोसेट अँटी-शिप क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. याव्यतिरिक्त, या वर्गाच्या पाणबुड्या बाबर -3 आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यास सक्षम आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन