शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

भारताचा नाद करायला निघाला! पाकिस्तानी नौदलाची हालत बेकार, दोनच पाणबुड्या कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 14:37 IST

Pakistan Navy submarine Issue: पाकिस्तानच्या दोन सबमरीन अगोस्ता ९० बी आणि ए अगोस्ता ७० ही पुढील वर्षाच्या मध्यानंतर सक्रीय होणार आहे. अगोस्ता ७० क्लासची पाणबुडी पीएएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. तसेच तिच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सपोर्ट सिस्टिममध्ये देखील समस्या येत आहे. यामुळे हा पाणबुडी गस्तही घालू शकत नाही आणि वेळ पडली तर युद्धही लढ शकत नाही अशा अवस्थेत आहे. 

इस्‍लामाबाद : भारताला टक्कर देण्याच्या मनसुब्याने स्पर्धा करणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) आता त्यांच्या नौदलातील युद्धनौका, पाणबुड्यांचा खर्च पेलवेनासा झाला आहे. तांत्रिक बिघाड आणि मेन्टेनन्समुळे नौदलाच्या केवळ दोनच पाणबुड्या कार्यरत आहेत. पाच पैकी तीन अगोस्ता क्लासच्या सबमरीन या एकतर अपग्रेड करण्यात येत आहेत किंवा त्या बिघडलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या नौका समुद्रात उतरू शकत नाहीएत. यामुळे आणखी वर्षभर पाकिस्तानला दोनच पाणबुड्यांच्या आधारे काम चालवावे लागणार आहे. (Pakistan navy force left with only two active duty submarines)

पाकिस्तानच्या दोन सबमरीन अगोस्ता ९० बी आणि ए अगोस्ता ७० ही पुढील वर्षाच्या मध्यानंतर सक्रीय होणार आहे. अगोस्ता ७० क्लासची पाणबुडी पीएएस हुरमतच्या इंजिनामध्ये बिघाड आहे. तसेच तिच्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सपोर्ट सिस्टिममध्ये देखील समस्या येत आहे. यामुळे ही पाणबुडी गस्तही घालू शकत नाही आणि वेळ पडली तर युद्धही लढ शकत नाही अशा अवस्थेत आहे. 

पाकिस्तानची आणखी एक पाणबुडी अगोस्ता ९० बी क्लास पीएनएस साद ही डॉकवर आहे. एप्रिलपासून तिचा मेंटेनन्स केला जात आहे. तर तुर्कस्तानने  दिलेली एसटीएम कंपनीच्या पाणबुडी देखील अपडेट केली जात आहे. ही पाणबुडी सी हॅक टॉर्पिडो, बाबर ३ क्रूझ मिसाईल डागण्यासाठी तयार केली जात आहे. तुर्कीची कंपनी पीएनएस खालीद पाणबुडीच्या दुरुस्तीचे काम करत आहे. अशाप्रकारे पाकिस्तानच्या युद्धनौका काही ना काही कारणाने अडकलेल्या आहेत. 

पाकिस्तानला चीनने आठवी पाणबुडी दिलेली नाही. यामुळे सध्यातरी पाकिस्तानला काही काळ दोनच पाणबुड्यांवर काम चालवावे लागणार आहे. पीएनएस हश्मत आणि पीएनएस हमजा असे या पाणबुड्यांची नावे आहेत. पाकच्या पाणबुड्याच नाहीत तर युद्धनौकांवर देखील हेच संकट आहे. पीएनएस खैबर एक गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे, या युद्धनौकेतून मोठा आवाज येत आहे. यामुळे ही नौकादेखील कामाला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल