शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:31 IST

Pakistan Rocket Force: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत.

भारताकडून ऑपरेशन सिंदूरवेळी सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तानला रहावत नाहीय. गेल्या महिन्यात पाकिस्तानने शाहीन-३ मिसाईलची दोन-तीनदा चाचणी केली. परंतू, ते भरकटले आणि दुसरीकडेच जाऊन पडले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने १४ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी रॉकेट फोर्स उभारण्याची घोषणा केली आहे. एक मिसाईल साधे उडविता येत नाही आणि हा पाकिस्तान चीनसारखी अख्खी रॉकेट फोर्स बनविण्याच्या बाता मारू लागला आहे. 

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत. परंतू, पाकिस्तानने भारताचा दु:स्वास करून अमेरिकेच्या साथीने युद्धे लादली आणि आपल्या जनतेला वाऱ्यावर, उपाशी सोडून दहशतवाद्यांना पोसण्यातच धन्यता मानली. आज भिकेला लागला तरीही पाकिस्तान काही सुधरलेला नाही. पाकिस्तानी लष्कराला भारताविरोधात लढण्यासाठी सक्षम करणे आणि दहशतवाद्यांना पोसणे हेच त्यांनी हित मानलेले आहे. 

शरीफ यांनी रॉकेट फोर्सची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. रॉकेट फोर्स आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि प्रत्येक दिशेने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम असल्याच्या बाताही त्यांनी मारल्या आहेत. पाकिस्तानची सर्व मिसाईल या चीनच्याच बनावटीच्या आहेत. ज्यांना भारताने दोन महिन्यांपूर्वीच पाणी पाजले आहे. 

पाकिस्तानकडे आहेत या मिसाईल...पाकिस्तानी सैन्याकडे सध्या ४०० किमी रेंजची एसएसएम फतेह-२ मिसाईल, ४५० किमी आणि ७०० किमीच्या रेंजसह फतेह-३ आणि फतेह-४ मिसाईल आहे. शाहीन मिसाईलही आहेत. चीनने दिलेली मिसाईल देखील आहेत. परंतू, त्यांचा वापर पाकिस्तानला करताच आलेला नाहीय. यामुळे ती भारताविरोधात कितपत यशस्वी होतील हे एक गूढच आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानने डागलेल्या मिसाईल भारताने आकाशातच उध्वस्त करून टाकल्या होत्या. एक मिसाईल तर त्यांचे जिवंत सापडले होते. ते देखील चीनने दिलेले होते. या चार दिवसांच्या लढाईत पाकिस्तानच नाही तर चीन आणि तुर्कीची देखील पुरती नाचक्की भारताने करून टाकली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान