शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाकने दोन अतिरेक्यांना दिली फाशी!

By admin | Updated: December 20, 2014 03:10 IST

फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतल्यानंतर लगेच पाकिस्तान सरकारने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री दोन अतिरेक्यांना फासावर लटकवले

इस्लामाबाद : फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतल्यानंतर लगेच पाकिस्तान सरकारने दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री दोन अतिरेक्यांना फासावर लटकवले. लष्कराच्या मुख्यालयावर आणि माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.पेशावरमधील लष्करी शाळेवरील भयंकर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतली होती. रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ल्यादरम्यान अकील ऊर्फ डॉ. उस्मान जखमी झाला होता. त्याला जिवंत पकडण्यात आले होते, तर दुसरा अतिरेकी अर्शद मेहमूद (मेहरबान) याला जन. मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्यात मृत्युदंड सुनावण्यात आला होता. जिओ आणि दुनिया टीव्हीसह पाकिस्तानमधील मुख्य खाजगी टीव्ही चॅनल्सनी या दोघांना शुक्रवारी रात्री ९ वाजता (स्थानिक वेळ) फैसलाबाद तुरुंगात फाशी देण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. लष्करप्रमुख जन. राहिल शरीफ यांनी गुरुवारी रात्रीच सशस्त्र दलविरोधी दहशतवादी कारवायातील सहा जणांना फासावर लटकविण्याच्या फतव्यावर स्वाक्षरी केली होती. पहिल्या टप्प्यात १७ अतिरेक्यांना फाशी दिली जाणार आहे. कोट लखपत जेलमधील चार अतिरेक्यांना शनिवारी फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. २००३ मध्ये जन. मुशर्रफ यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना मृत्युदंड सुनावण्यात आला होता. यात मेहमूदचाही समावेश होता. या हल्ल्यात १५ जण ठार झाले होते.