शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या अयाज सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याची तयारी सुरू

By कुणाल गवाणकर | Updated: November 1, 2020 09:51 IST

अभिनंदन यांच्या घरवापसीचं सत्य सांगणाऱ्या अयाज सादिक यांच्याविरोधात पाकिस्तान सरकार आक्रमक

इस्लामाबाद: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घरवापसीमागचं सत्य सांगून पाकिस्तान सरकारची पोलखोल करणारे खासदार अयाज सादिक यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. सादिक यांनी केलेल्या विधानांमुळे इम्रान खान सरकारच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे आता इम्रान खान सरकार हात धुवून सादिक यांच्या पाठीमागे लागलं आहे. पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष असलेल्या सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी इम्रान खान सरकारनं सुरू केली आहे.अभिनंदन यांची सुटका झाली नसती तर...; हवाई दलानं सांगितली काय होती रणनीतीसादिक यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असं खान यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या शिबली फराज यांनी सांगितलं. यानंतर शनिवारी पाकिस्तानचे गृहमंत्री इजाज शाह यांनी सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचे संकेत दिले. 'सादिक यांच्याविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. सादिक यांच्याविरोधात संविधानाच्या कलम-६ अंतर्गत खटला चालवण्याची मागणी यातून करण्यात आली आहे,' असं शाह म्हणाले. पाकिस्तानच्या संविधानातील कलम-६ देशद्रोहाशी संबंधित आहे.आश्चर्य! लाहोरच्या रस्त्यांवर लागले अभिनंदन आणि मोदींचे पोस्टरकाय म्हणाले होते अयाज सादिक? भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परिस्थिती काय होती, याची माहिती संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी दिली. 'भारत हल्ला करेल या भीतीनं तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय कापत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम अगदी स्पष्ट दिसत होता. बाजवा यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत होती,' असं सादिक यांनी संसदेला सांगितलं. या बैठकीला परराष्ट्रमंत्री महमूद शाह कुरेशी उपस्थित होते, अशी माहितीही सादिक यांनी दिली. 'कुरेशी त्या बैठकीला उपस्थित असल्याचं मला आठवतं. त्या बैठकीला हजर राहण्यास पंतप्रधान इम्रान खान यांनी नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय कापत होते. त्यांना घाम फुटला होता. अभिनंदन यांची सुटका करा. अन्यथा भारत हल्ला करेल, असं आम्ही कुरेशी यांनी म्हटलं होतं,' असं सादिक यांनी म्हटलं. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचं पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्याजा मोहम्मद आसिफ यांनी संसदेत म्हटलं. 'पाकिस्तानचं सरकार प्रचंड घाबरलं होतं. त्यामुळे त्यांनी जराही वेळ न घालवता अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय घेतला. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूष करण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्यात आली,' असं आसिफ म्हणाले. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान