शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना दिली फाशीची शिक्षा

By admin | Updated: April 10, 2017 15:53 IST

भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 10 - भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानातल्या रावळपिंडी न्यायालयानं कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननं दिलं आहे. कुलभूषण जाधवांवर भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे एजंट असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.जाधव यांना 3 मार्च 2016ला पाकिस्ताननं बलुचिस्तानमधून अटक केली होती. पाकिस्तानी आर्मी अॅक्ट(PAA)अंतर्गत हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत फील्ड जनरल कोर्ट मार्शल(FGCM)नुसार त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स(ISPR)नं दिली आहे. पाकिस्ताननं जाधवांवर विध्वंसक हालचाली केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्याविरोधात क्वेटाच्या दहशतवाद विरोधी विभागानंही गुन्हा दाखल केला आहे.पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण जाधव यांच्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधील तक्का येथील (जसदानवाला कॉम्प्लेक्स) हायपॉइंट को. हौ. सो.मध्ये तो हुसेन मुबारक या नावाने राहत होते. पनवेलमधील फ्लॅट कुलभूषण यांची आई अवंती जाधव यांच्या नावावर आहे. त्यांचे वडील सुधीर जाधव निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.(कुलभूषणचे पनवेलमध्ये घर(कुलभूषणला महिन्यापूर्वीच अटक ?)25 वर्षांपूर्वी त्यांनी पनवेलमध्ये हे घर खरेदी केल्याचे बोलले जात आहे. 12 मे 2014ला ठाणे पासपोर्ट कार्यालयातून बनविण्यात आलेल्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता दिला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कुलभूषण या ठिकाणी आले नव्हते. 2014मध्ये कुलभूषण यांना या ठिकाणच्या स्थानिक रहिवाशांनी पाहिलं होतं. मराठी, हिंदीत संवाद साधणारे कुलभूषण 2010पर्यंत अधूनमधून येत असल्याची माहिती रहिवासी जे. बी. भोईर यांनी दिली. कुलभूषण यांनी एका महिन्यापूर्वी पत्नीशी शेवटचा संपर्क साधला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. कुलभूषण हे रॉ संघटनेचे हस्तक असल्याच्या आरोपावरून त्यांना पाकिस्तानात अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच जाधव कुटुंबीयांनी परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. जाधव वास्तव्यात असलेल्या पवईतील हाऊसिंग सोसायटी आणि इमारतीच्या आसपास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या इमारतीतील कोणीही त्यांच्या वा कुटुंबाविषयी बोलायला तयार झाले नव्हते. काहींनी तर आम्ही त्या कुटुंबाला ओळखत नसल्याचेच सांगितले होते. 

कोण आहेत कुलभूषण जाधव?पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे. त्यांना पाकिस्तानने बलुचिस्तान येथून अटक केली आहे. मुंबईतील कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये एका महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणला गेला होता. त्यांचा आणि भारताच्या रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर यंत्रणेशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे वडील हे माजी पोलीस सहायक आयुक्त आहेत. कुलभूषण यांनी तीन महिन्यांपूर्वी आपले वडील सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, तर पत्नीशी तो एका महिन्यापूर्वी बोलला होता. त्यानंतर ना त्याचा फोन वा मेल आला, ना त्याच्याशी घरच्यांचा संपर्क झाला. त्यामुळे एका महिन्याच्या काळातच त्याला पाकिस्तान सरकारने अटक केली असावी, असे घरच्यांना वाटत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणमधील बंदर अब्बास आणि छाबहर बंदरांतून मालवाहतूक करीत असे. त्याच्याकडे इराणमध्ये जूनपर्यंत राहण्यासाठी अधिकृत परवाना होता. त्याचा स्वत:च्या व्यापाराखेरीज कशाशीही संबंध नव्हता, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही सांगितले.