शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षानंतर मायदेशी परतले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ; म्हणाले, "परिस्थिती खूपच बिघडलीय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 16:34 IST

नवाझ शरीफ हे विशेष विमान 'उमीद-ए-पाकिस्तान' ने दुबईहून इस्लामाबादला पोहोचले. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्रिटनमध्ये चार वर्षांच्या आत्म-निर्वासितानंतर शनिवारी दुबईहून विशेष विमानाने नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले आहेत.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (PML-N) प्रमुख नवाझ शरीफ हे विशेष विमान 'उमीद-ए-पाकिस्तान' ने दुबईहून इस्लामाबादला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मित्रमंडळीही होती. तत्पूर्वी, दुबई विमानतळावर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल पत्रकारांसमोर चिंता व्यक्त केली. 

देशातील परिस्थिती २०१७ च्या तुलनेत खूपच बिघडल्याचे नवाझ शरीफ यांचे म्हणणे आहे. तसेच, विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी नवाझ शरीफ यांनी दुबई विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, आम्ही देशाच्या समस्या सोडविण्यास सक्षम आहोत. नवाझ शरीफ म्हणाले, "परिस्थिती २०१७ पेक्षा चांगली नाही... आणि हे सर्व पाहून मला वाईट वाटते की, आपला देश पुढे जाण्याऐवजी मागे गेला आहे."

जिओ न्यूजने नवाज शरीफ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "पाकिस्तानमधील परिस्थिती खूप वाईट आहे आणि ती खूप चिंताजनक आहे". दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले होते आणि नंतर भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये त्यांना जबाबदार धरत दोषी घोषित करण्यात आले होते. 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान