शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Pakistan Economic Crisis : जगाला पाकिस्तानवर विश्वास नाही, IMF-World Bank चं ‘हे’ रेटिंग दिवाळखोरीचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 14:01 IST

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून (Pakistan Economic Crisis) जात आणि दुसरीकडे पाकिस्तानातील जनता उपासमारीनं त्रस्त आहे.

पाकिस्तान आज मोठ्या आर्थिक संकटातून (Pakistan Economic Crisis) जात आणि दुसरीकडे पाकिस्तानातील जनता उपासमारीनं त्रस्त आहे. ही परिस्थिती असतानाही एक-दोन देश सोडून कोणीही त्यांना मदत करण्यास तयार नाही. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या देशाकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाठ फिरवली आहे. दरम्यान, आयएमएफ, जागतिक बँकेपासून ते आशियाई विकास बँकेपर्यंत देशाच्या विकासदराचा अंदाज लावला असता, पाकिस्तानवर कोणाचाच विश्वास नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही मानांकनं देशाच्या दिवाळखोरीचाच पुरावा आहेत.

पाकिस्तानातील महागाईचा दर ३५ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. महागाई दर नियंत्रणात येण्याची शक्यताही कमीच दिसत आहे. यापूर्वी महागाईचा दर आणखी वाढण्याचा इशाराही सरकारनं दिला होता. पिठापासून दुधापर्यंत, विजेपासून गॅसपर्यंत सर्वच गोष्टींवर देशातील जनता आता अवलंबून आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की लोक पिठाचीही लूट करत आहेत आणि या प्रकारांमध्ये अनेकांना आपा जीवही गमवावा लागत आहे. यासोबतच देशावरील प्रचंड कर्ज हे संकट आणखीनच वाढवत आहे.

मोठं कर्जपाकिस्ताननं आतापर्यंत अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. देशावर एकूण कर्ज आणि देणी ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. या कर्जातील ३५ टक्के हिस्सा हा केवळ चीनचाच आहे. यामध्ये चीनच्या सरकारी बँकांचाही समावेश आहे. पाकिस्तानवर चीनचं कर्ज ३० अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे, फेब्रुवारी २०२२ मध्ये ते २५.१ अब्ज डॉलर्स होते. येत्या जून महिन्यात पाकिस्तानला चीनला ३ अब्ज डॉलर्स द्यायचे आहेत.

अद्यापही मदतीची अपेक्षा पाकिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीत त्यांना मदत करणाऱ्या देशांमध्ये चीनचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनला ७० कोटी डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा केली होती. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या बेल आऊट पॅकेजची वाट पाहत आहे. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या ६.५ अब्ज डॉलर्सच्या बेल आऊट कराराच्या हिस्स्याच्या रुपात पाकिस्तान आयएमएफकडून १.१ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची मागणी करत आहे. परंतु याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

आर्थिक विकास दराचा अंदाज घटलाया सर्व गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानच्या आर्थिक विकास दराचा अंदाज पूर्णपणे कमी केला आहे आणि तो ०.५ टक्के राहू शकतो असं म्हटलं आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये जागतिक संस्थेनं पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज ३.५ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर आणला होता. यासोबतच, आयएमएफने आपल्या ताज्या ग्लोबल इकॉनॉमी आउटलुक अहवालात असंही म्हटलंय की देशातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षीच्या ६.२ टक्क्यांवरून चालू आर्थिक वर्षात ७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

केवळ आयएमएफच नव्हे, तर जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनंही पाकिस्तानच्या विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे. तेही आयएमएफन मांडलेल्या अंदाजाच्या जवळपास आहेत. चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानची अर्थव्यवस्था ०.४ टक्के दराने वाढेल असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. याशिवाय आशियाई विकास बँकेने (ADB) देशाची अर्थव्यवस्था ०.६ टक्के दरानं वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान, या पाकिस्तानला २०२४ मध्ये थोडा दिलासा मिळू शकतो असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशाचा आर्थिक विकास दर ३.५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलीये.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनWorld Bankवर्ल्ड बँक