शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

"आमदनी अट्ठानी और...", पाकमध्ये पीठ, डाळ खरेदीसाठी पैसे नाहीत; पण आलिशान गाड्यांसाठी लागलीय रांग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 12:30 IST

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानात पीठ, डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशात परकीय चलनसाठा संपत आला आहे.

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानात पीठ, डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. देशात परकीय चलनसाठा संपत आला आहे. सध्या पाकिस्तानला  जागतिक बँकेकडून आयएमएफकडून कर्जाची अपेक्षा आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती महागल्या आहेत, तर दुसरीकडे धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढी आर्थिक नासाडी होऊनही देशात आलिशान गाड्यांची मागणी वाढली आहे. यादरम्यान देशात कारची आयातही झपाट्याने वाढली आहे.

आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या 6 महिन्यांत 2200 लक्झरी कार आणि महागड्या इलेक्ट्रिक वाहनांची आयात करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 1.2 अरब अमेरिकी डॉलक अब्ज खर्च झाले आहेत. देशातील आर्थिक संकट अधिक गडद झाल्यानंतरही महागड्या वाहनांची आयात केली जात आहे, एकीकडे जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, तर मोठ्या प्रमाणात गरिबी आल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे आलिशान गाड्या मोठ्या प्रमाणात मागवल्या जात आहेत. 

देशात परकीय चलनाची कमतरता आहे आणि अहवालांनुसार, देशात फक्त 5 बिलियन डॉलर पेक्षा कमी परकीय चलन आहे, हे चलन फक्त तीन आठवडेच राहणार आहे. या बिकट अवस्थेतही पाकिस्तान सरकारने वाहनांच्या आयातीवर 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 9770 कोटी रुपये खर्च केले आहेत.

परकीय चलनाच्या कमतरतेमुळे विविध वस्तू आणि उत्पादनांचे कंटेनरांचे ढीग लागले आहेत. पाकिस्तानच्या विविध बंदरांवर 8,500 पर्यंत कंटेनर येऊन थांबले आहेत, या कंटेनरनरचे पैसे देण्यासाठी नाहीत.  पाकिस्तानने आयातीवर सुमारे शंभर अब्जांचा मोठा खर्च केला आहे आणि हे काम फक्त 2 अब्ज रुपयांचे शुल्क आणि इतर कर टाळण्यासाठी केले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जुलै-डिसेंबर 2022 या कालावधीत 1,990 युनिट्स आयात करून तीन वर्षे जुन्या लक्झरी वाहनांच्या आयातीत सर्वात लक्षणीय वाढ झाली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाईcarकार