शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमावाने पेट्रोल पंपालाच आग लावली, पाकिस्तानात श्रीलंकेसारखा राडा, जाळपोळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:14 IST

pakistan economic crisis : पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट (Pakistan Economic Crisis) झाली आहे. येथील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत. महागाईने होरपळलेली जनता कधी पिठासाठी भांडताना दिसून येते, तर कधी पेट्रोलच्या किमती (Petrol Price in Pakistan) वाढल्यामुळे आक्रोश करताना दिसते. 

दरम्यान, वाढत्या महागाईदरम्यान पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव वाढल्याने जमावाने संताप व्यक्त केला आणि पेट्रोल पंपालाच आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे सरकार आणि जनता प्रचंड अस्वस्थ आहे. तिजोरी भरण्यासाठी शाहबाज सरकार जनतेवर कराचा बोजा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ केली असून या निर्णयामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जाळपोळ केल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल एका पाकिस्तानी नागरिकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संतप्त जमावाने पेट्रोल पंप पेटवताना दिसत आहे. या यूजरने सांगितले की, देशात पेट्रोलच्या दरात 35 रुपयांची वाढ झाल्याने लोक संतप्त झाले असून त्यांनी लाहोरमध्ये एका पंपाला आग लावली. या घटनेनंतर पंपातून धुराचे लोट दूरवरून दिसत होते.

वाढत्या महागाईमुळे लोक हैराण दरम्यान, पाकिस्तानमधील वाढत्या महागाईमुळे येथील लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल ते पीठाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानातील शहरांमध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 220.4 रुपये, दुधाचा भाव 114.8 रुपये प्रति लिटरवरून 149.7 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पीठ 150 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. तसेच, मोहरीचा भाव पाचशे रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 249.80 रुपये प्रति लीटर, हाय-स्पीड डिझेल 262.80  रुपये प्रति लिटर, रॉकेल 189.83 रुपये आणि हलके डिझेल 187 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

श्रीलंकेत सुद्धा आर्थिक परिस्थिती होती बिकट श्रीलंकेत गेल्यावर्षी महागाई आणि हिंसाचाराने थैमान माजवले होते. आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेत भीषण स्थिती निर्माण झाली होती. यानंतर हजारो निदर्शकांनी थेट तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. या घटनेनंतर असंतोष आणखीच वाढताना दिसल्यानंतर पुढील धोका लक्षात घेत तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरल