शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:43 IST

सौदी अरेबियाला कायम इराणकडून धोका असतो. या दोन्ही देशात कट्टर शत्रूता आहे. इराण शिया बहुल देश आहे तर सौदीत सुन्नी मुसलमानांची संख्या अधिक आहे. या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमी असते.

इस्लामाबाद - अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यात पाकिस्तानचे जवळपास १३ हजार सैनिक आणि १० ते १८ लढाऊ विमाने सौदी अरेबियाला पोहचले आहेत. पाकिस्तानी सैनिक किंग अब्दुल अजीज एअर बेसवर पोहचल्याचं सौदी सरकारने सांगितले आहे. या सैनिकांसोबत एअर फोर्सची लढाऊ विमानेही दाखल झाली आहेत. 

मागील सप्टेंबर महिन्यात पाकिस्तान आणि सौदी अरेबियात स्ट्रॅटेजिक म्युचुअल डिफेन्स एग्रीमेंट झालं होते. या करारात स्पष्टपणे लिहिलं होते की, कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर हा हल्ला दोन्ही देशांवर मानला जाईल. त्यामुळे त्याच कराराचा भाग म्हणून पाकिस्तानी सैन्य सौदी अरेबियात पोहचले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सैन्य इराणविरोधात थेट युद्धात उतरणार का असा प्रश्न पडला आहे. याआधीही सौदीत १० हजार पाकिस्तानी सैन्य तैनात होते. आता नव्याने आलेल्या १३ हजार सैनिकांमुळे सौदीत पाकिस्तानी जवानांची संख्या वाढली आहे.

पाकिस्तानने १० ते १८ लढाऊ विमाने सौदीत पाठवली आहेत. पाकिस्तानी सरकारच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. दोन्ही देशांतील सैन्य सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दोन्ही देशातील सैन्य चांगल्या प्रकारे काम करतील आणि परिसरात सुरक्षा मजबूत करतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी वर्तवला. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात जुने आणि मजबूत संबंध आहेत. पाकिस्तानने यापूर्वीही सौदीला सैन्य मदत केली आहे. १९९१ च्या आखाती युद्धातही पाकिस्तानने सैन्य पाठवले होते. आता २०२५ मध्ये नव्याने झालेल्या संरक्षण करारामुळे हे दोन्ही देश आणखी जवळ आले आहेत.

इराणकडून धोका 

सौदी अरेबियाला कायम इराणकडून धोका असतो. या दोन्ही देशात कट्टर शत्रूता आहे. इराण शिया बहुल देश आहे तर सौदीत सुन्नी मुसलमानांची संख्या अधिक आहे. या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमी असते. त्यात पाकिस्तान सौदीचा मित्र बनून उभा राहिला आहे. सध्या पश्चिम आशियात तणाव आहे. अमेरिका इराण यांच्यात शांतता चर्चा सुरू होती परंतु ही चर्चा निष्फळ ठरली. त्याचवेळी पाकिस्तानी सैन्य सौदीत पोहचले आहे. इराणनं मध्य पूर्वेतील युद्धात सौदीच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यामुळे सौदीला त्यांची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करायची आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची त्यांना मदत होणार आहे.

पाकिस्तानी सैन्य इराणविरोधात लढणार?

दरम्यान, पाकिस्तानी सैन्य थेट इराणविरोधात लढणार का हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. यावर अधिकृतपणे कुठलेही उत्तर आले नाही. पाकिस्तानने कायम आम्ही मध्यस्थीची भूमिका करत आहोत असं सांगितले आहे. परंतु संरक्षण करारानुसार इराणने सौदीवर हल्ला केला तर पाकिस्तानला सौदीची मदत करावी लागेल. म्हणजेच जर युद्ध झाले तर पाकिस्तानी सैनिक आणि विमाने सौदीकडून लढू शकतात. एकीकडे शांतता चर्चा तर दुसरीकडे सौदीत सैन्य पाठवून पाकिस्तान दुहेरी डाव खेळत असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. पाकिस्तानसाठी सौदी महत्त्वाचा देश आहे कारण सौदी पाकिस्तानला आर्थिक मदत करतो. त्यामुळे युद्ध भडकलेच तर पाकिस्तानी सैन्य युद्धात उतरून इराणविरोधात लढतील का हे पाहणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's double game: Sends troops to Saudi amid US-Iran tension.

Web Summary : Amid failed US-Iran talks, Pakistan deployed 13,000 troops and fighter jets to Saudi Arabia per a defense pact. Concerns rise over potential conflict with Iran, given Saudi-Iran rivalry and Pakistan's economic ties to Saudi Arabia.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरsaudi arabiaसौदी अरेबिया