शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कधी कधी मुलांच्या हातून घडून जातं; श्रीलंकन व्यक्तीच्या हत्येवर पाकच्या मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:24 IST

सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानात मॉब लिचिंगची एक धक्कादायक घटना घडली होती. सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्दीनं त्या व्यक्तीचा मृतदेह पेटवला. सियालकोटमधील वझिराबाद मार्गावर ही घटना घडली. दरम्यान, यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक (Defence Minister of Pakistan Pervaiz Khattak) यांचं धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे. परवेझ खटक यांनी श्रीलंकन नागरिकाची हत्या करणाऱ्यांचा बचाव करत ती लहान मुलं असून उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं. "ती लहान मुलं आहेत, ते जोशात येतात आणि उत्स्फुर्तपणे काम करून मोकळे होतात. याचा अर्थ देश विनाशाच्या मार्गावर जातोय असं नाही. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. इस्लाम विरोधी असल्याचं त्यानं घोषणा दिल्या. परंतु त्यांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती," असंही ते म्हणाले.लोकांना समजवा"या घटनेला जे रुप दिलं जातंय तसं काहीच नाही. मी देखील एखादी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देऊ शकतो. परंतु सर्वकाही खराब झालंय असा त्याचा अर्थ होत नाही," असंही ते म्हणाले. प्रियंता कुमारा दियावदनाची मॉब लिंचिंग एक सामान्य घटना असल्याचंही ते म्हणाले.काय आहे प्रकरण?खासगी कंपनीत काम करत असलेल्या मजुरांनी कारखानाच्या व्यवस्थापकावर हल्ला केला. त्यानंतर मोठी गर्दी जमली. सगळ्यांनी व्यवस्थापकाला बेदम मारलं. त्यामुळे त्याचा जीव गेला. यानंतर गर्दीनं त्याला पेटवून दिलं. पोलीस या घटनेचा तपास करत असून गर्दीच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव प्रियांथा कुमारा असं आहे. प्रियांथा कुमारा यांनी मोहम्मद पैगंबर यांची निंदा केल्याचा आरोप कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSri Lankaश्रीलंका