वॉशिंग्टन- पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी ही माहिती दिली आहे. काही दहशतवादी संघटना पाकिस्तानचा भारताविरोधात वापर करून घेत आहेत. परंतु पुढे जाऊन त्या दहशतवादी संघटनांपासून पाकिस्तानलाच खरा धोका आहे. तसेच तालिबानविरोधातली मोहीम आम्ही आणखी तीव्र करू, असंही डेन कोट्स म्हणाले आहेत.कोट्स यांनी गुप्तचर विषयांच्या मुद्द्यांवर अमेरिकेतील सिनेटच्या निवड समितीला सांगितले की, पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये हल्ले करणे आणि तसेच अमेरिकेच्या विरोधात हल्ल्याच्या योजना बनवून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पाकिस्तानची मदत घेणं सुरूच ठेवणार आहेत. कोट्स यांनी निवड समितीसमोर यासंदर्भात एक अहवालही सादर केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक कार्यक्रमांमध्ये होत असलेल्या वृद्धीनं दक्षिण आशियातही आण्विक सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, अशी भीतीही कोट्स यांनी अहवालातून व्यक्त केली आहे. तसेच भारतातल्या भाजपानं हिंदूंच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवल्यास भारतात सांप्रदायिक वादही निर्माण होऊ शकतो. या अहवालात भारत आणि चीनमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयीही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि चीनमध्येही द्विपक्षीय संबंध फार चांगले राहणार नाहीत. दोन्ही देशांतील संबंध सुस्थितीत होण्यासाठी मोदी आणि शी जिनपिंग यांच्या प्रयत्नांनाही यश येणार नाही. तसेच येत्या काळात या दोन्ही देशांमध्ये संबंध तणावपूर्ण राहतील, असंही कोट्स म्हणाले आहेत.
पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर हल्ले सुरूच ठेवणार- अमेरिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 07:56 IST
पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना या भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.
पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना भारतावर हल्ले सुरूच ठेवणार- अमेरिका
ठळक मुद्देपाकपुरस्कृत दहशतवादी संघटना भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार आहेतकाही दहशतवादी संघटना पाकिस्तानचा भारताविरोधात वापर करून घेत आहेत.तालिबानविरोधातली मोहीम आम्ही आणखी तीव्र करू, असंही डेन कोट्स म्हणाले आहेत.