शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan: काश्मीरमधून आखातात जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानची हद्दबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:37 IST

श्रीनगरहून पाकिस्तानच्या हवाई मार्गे आखाती देशांना जाण्यासाठी सुमारे ३ तास ४० मिनिटे लागतात. पण आता ही हवाई हद्द वापरता येत नसल्याने या प्रवासाच्या वेळेत आणखी ४० ते ५० मिनिटांची वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरहून आखाती देशांकडे जाणाऱ्या व तिथून काश्मीरला येणाऱ्या  विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करू देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. त्यामुळे या विमानांना वेगळ्या मार्गाने जावे लागत असून, त्यामुळे प्रवासाचा वेळही वाढला आहे. पाकिस्तानच्या या कृतीचा भारताने निषेध केला आहे.

गोफर्स्ट या कंपनीने श्रीनगर ते शारजाह या मार्गावर विमानसेवा सुरू केली. या विमानाची आठवड्यातून चार वेळा उड्डाणे होतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विमानसेवेचे २३ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले होते. त्यानंतर पहिले काही दिवस गोफर्स्टच्या विमानांना पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरू दिली. त्यानंतर नकारघंटा वाजविण्यास सुरूवात केली. त्यामुळे काश्मीरहून आखाती देशांकडे जाणाऱ्या विमानांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

श्रीनगरहून पाकिस्तानच्या हवाई मार्गे आखाती देशांना जाण्यासाठी सुमारे ३ तास ४० मिनिटे लागतात. पण आता ही हवाई हद्द वापरता येत नसल्याने या प्रवासाच्या वेळेत आणखी ४० ते ५० मिनिटांची वाढ झाली.  श्रीनगर ते शारजाह या मार्गावर उड्डाण करणाऱ्या भारतीय विमानांना पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केल्याबद्दल त्या देशाला भारताने पत्र लिहिले आहे. पण त्यावर पाकिस्तानने अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही. 

याआधीही झाली होती हवाई हद्दबंदी  २०१९ साली भारतीय हवाई दलाने बालाकोट हल्ला येथे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई हल्ले केले होते.  त्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारताला १३८ दिवसांसाठी बंद केली होती.  त्यावेळीही भारताने या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेकडे (आयीसीएओ) आवाज उठविला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर