इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हिंसाचारग्रस्त खैबर पख्तुनख्वा प्रांतात सोमवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी चालविलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे एका किशोरवयीन मुलासह तीन पोलीस कर्मचारी ठार झाले. हांगू जिल्ह्यातील काजी पूल भागातील एका पोलीस चौकीवर हा हल्ला करण्यात आला. यात १५ वर्षीय मुलासह तीन पोलीस कर्मचारी ठार झाले, असे स्थानिक पोलीसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकमध्ये हल्ला; तीन पोलीस ठार
By admin | Updated: September 23, 2014 06:25 IST