शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या प्रवासी विमानाला पाकच्या F-16नं तासभर घेरलं; ना’पाक’ कुरापती सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 18:20 IST

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत.

इस्लाबामाद- बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. गेल्या महिन्यात पाकच्या दोन एफ-16 या लढाऊ विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या एक भारतीय प्रवासी विमानाला आकाशात घेरलं होतं. जवळपास पाकच्या एफ16 विमानांनी भारताच्या प्रवासी विमानाचा तासभर पाठलाग केला होता.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी स्पाइसजेटच्या विमानाला हवेत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकच्या एफ-16मधील वैमानिकांनी भारतीय विमानाच्या वैमानिकाला विमानाची उंची कमी करून माहिती देण्यास सांगितलं होतं. स्पाइसजेटच्या कॅप्टननं एफ 16 वैमानिकांना सांगितले की, हे स्पाइसजेट आहे; जे भारताचं व्यावसायिक विमान आहे. यात प्रवासी असून, ठरलेल्या वेळेत काबूलला जात आहे. ..अन् त्यावेळी विमानातील 120 प्रवासी घाबरलेपाकिस्तानच्या एफ 16 विमानानं जेव्हा भारताच्या प्रवासी विमानाला घेरलं, तेव्हा त्यात 120 प्रवासी होते. विशेष म्हणजे ही घटना तेव्हा घडली जेव्हा भारताच्या प्रवेशासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद नव्हती. ही घटना गेल्या 23 सप्टेंबरला झाली आहे. स्पाइसजेटचं विमान एसजी—21 दिल्लीहून अफगाणिस्तानच्या काबूलला जात होते. पाकिस्तानच्या एफ 16 विमानानं भारताच्या स्पाइस जेट विमानाला घेरलं होतं, ते त्या विमानाभोवतीच घिरट्या घालत होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांनीही ती विमानं पाहिली. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशानं सांगितलं की, पाकिस्तानी वैमानिक संकेतांच्या माध्यमातून स्पाइसजेटच्या वैमानिकाला विमानाची हवेतील उंची कमी करण्याची सूचना करत होते. प्रत्येक विमानाचा एक कोड असतो. स्पाइसजेटचा कोड ‘एसजी’ आहे. परंतु पाक एटीसीनं तो ‘एआय’ असा वाचला आणि ते भारतीय हवाई दलाचं विमान समजले. पाकला परिस्थिती समजल्यानंतर लढाऊ विमानांनी भारताच्या विमानाला अफगाणिस्तानच्या हवाई सीमेपर्यंत नेऊन सोडले. त्यानंतर पाकिस्तानी दूतावासाचे अधिकारी कागदी कारवाई पूर्ण करण्यासाठी काबूलला पोहोचले, त्यामुळे विमानाचा जवळपास पास तास खोळंबा झाला. 

टॅग्स :spicejetस्पाइस जेटPakistanपाकिस्तान