शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

Pakistan Army Crisis : कंगाल पाकिस्तानला परेड दाखवायलाही पैसा नाही; आर्थिक संकटाचा लष्कराला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 17:24 IST

Pakistan Army Crisis : काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाच सापडला आहे.

Pakistan Army Crisis : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाच सापडला असून तेल, पीठ, डाळींसह चिकनचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे परकीय चलनसाठा संपत आला आहे. तर दुसरीकडे अजुनही आयएफएमने कर्ज दिलेले नाही. आता पाकिस्तानचे हे संकट लष्करापर्यंत पाहाचले आहे. लष्कराला ग्राउंडवरील परेडसाठीही पैसे मिळत नसल्याचे समोर आले आहे. 

दरवर्षी २३ मार्च रोजी होणाऱ्या पाकिस्तान 'डे' परेडला पाकिस्तानी लष्कराने 'मर्यादित' करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लष्कर हे पाऊल उचलणार आहे.  १९४० च्या लाहोर ठरावाच्या स्मरणार्थ २३ मार्च रोजी पाकिस्तान दिन साजरा करतो. यावेळी पाकिस्तानी लष्कर आपली शस्त्रास्त्रे आणि सामर्थ्य दाखवते. मात्र यंदाच्या आर्थिक संकटाचा परिणाम या परेडवरही पाहायला मिळणार आहे. शाहबाज सरकारने आधीच लष्कराला आपल्या खर्चात कपात करण्यास सांगितले आहे. 

चीनमध्ये लॉकडाऊनची तयारी; कोरोनानंतर आता 'या' आजाराचा हाहाकार, औषधांचा तुटवडा

आर्थिक संकटामुळे यावेळी परेड शकरपारियन परेड मैदानाऐवजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी जाहीर केलेल्या 'खर्च-कपात' मोहिमेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानवर सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दबाव येत आहे.

पाकिस्तान पहिल्यांदाच एवढ्या वाईट आर्थिक संकटातून जात आहे. आयएमएफशी कर्जासाठी अजुनही चर्चा सुरू आहे. IMF सोबत कर्मचारी-स्तरीय करार येत्या दोन दिवसांत होऊ शकतो. इस्लामाबादमध्ये एका चर्चासत्राला संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाले की, सध्याच्या सरकारला आर्थिक संकटाचा वारसा मिळाला आहे. सरकार देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी पावले उचलत आहे. (Pakistan Army Crisis )

भारताप्रमाणे पाकिस्तानलाही आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करावी लागेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये पाकिस्तानने भारताचा आदर्श न पाळल्यास येणारे दिवस त्यांच्यासाठी अधिक कठीण होतील, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान