शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाकला एकाकी पाडा, निर्बंध घाला - नरेंद्र मोदी

By admin | Updated: September 9, 2016 05:40 IST

आमचा ‘एक शेजारी’ देश दहशतवाद निर्माण करून त्याची निर्यात करतोय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकवर पुन्हा हल्ला चढवला.

व्हिएनतियान : आमचा ‘एक शेजारी’ देश दहशतवाद निर्माण करून त्याची निर्यात करतोय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकवर पुन्हा हल्ला चढवला. अशा चिथावणीखोर देशाला एकाकी पाडण्यात यावे आणि त्याच्यावर निर्बंध आणावेत असे आवाहनही मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. आमच्या शेजारी असलेल्या एका देशाचे वैशिष्ट्य म्हणजे, दहशतवाद जन्माला घालून त्याची निर्यात करणे, असे ते पाकचा थेट उल्लेख न करता म्हणाले. मोदी येथे भरलेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘दहशतवादाच्या या निर्यातीमुळे शांततेसाठीची जागा घटत असून, हिंसाचारासाठी मात्र वाढत आहे. पर्यायाने सगळ््यांचीच शांतता व समृद्धी धोक्यात आली आहे. या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. चारच दिवसांपूर्वी मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या परिषदेत सदस्य देशांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.ओबामा-द्युतेर्ते भेटबराक ओबामा यांच्याबद्दल फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो द्युतेर्ते यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्यानंतरही उभयतांची बुधवारी भोजनापूर्वी अनौपचारिक भेट झाल्याचे फिलिपाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आक्षेपार्ह विधानानंतर ओबामा यांनी द्युतेर्ते यांच्याशी मंगळवारी ठरलेली नियोजित भेट रद्द केली होती.मोदी यांनी गुरुवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. त्याआधी त्यांची हँगझोऊ येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली होती. मोदींनी लाओशियन पंतप्रधान थोंगलाऊन सिसोलिथ आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युऊन-हाये यांचीही भेट घेतली होती. बुधवारी रात्री मोदी व बराक ओबामा यांचीही भेट झाली.मोदी आणि बराक ओबामा यांची यावेळी भेट झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये झालेली या दोघांची ही आठवी भेट होती. अमेरिकेचा भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी पाठिंबा असेल असे ते म्हणाले.