२६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाचा नकार

By admin | Published: January 15, 2016 02:05 AM2016-01-15T02:05:15+5:302016-01-15T02:05:15+5:30

मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी

Pak court rejects 26/11 attacks | २६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाचा नकार

२६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाचा नकार

Next

इस्लामाबाद : मुंबईतील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेल्या बोटीचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमण्याची सरकार पक्षाची मागणी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. या हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी ‘अल-फौज’ बोटीचा वापर करीत मुंबईत प्रवेश केला होता.
न्यायालयीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ जानेवारी रोजी न्यायालयाने सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांचा अखेरचा युक्तिवाद झाल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने वरील निकाल दिला. रावळपिंडीच्या आदिल तुरुंगात ही सुनावणी झाली. सरकार पक्षाने ‘अल-फौज’ ला या प्रकरणात मुद्देमाल म्हणून समाविष्ट करावे व तिचे परीक्षण करण्यासाठी आयोग नेमावा अशी मागणी केली होती. ही बोट कराची बंदरात पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून दहा अतिरेक्यांनी एके -४७ व हातबॉम्ब घेऊन तिच्यातून भारतात प्रवेश केला होता.
क्षेत्रीय चौकशी संस्थेच्या म्हणण्यानुसार कथित हल्लेखोरांनी ‘अल-फौज’ सह तीन बोटींचा वापर केला होता. दहशतवाद्यांनी जिथून बोट व इंजिन खरेदी केले ते दुकानही शोधून काढले आहे तसेच चलनाचे रूपांतर करणारी संस्था व संबंधित बँकेचाही शोध लावला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याची योजना तयार करणाऱ्या लष्करच्या ७ दहशतवाद्यांना त्यांचा म्होरक्या झकीउर रहेमान लखवी याच्यासह अटक केली. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी न्यायालयात खटला भरला. त्याची सुनावणी सुरू आहे.

Web Title: Pak court rejects 26/11 attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.