शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात, पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा झटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 14:04 IST

एखादी व्यक्ती घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार नाहीत.     

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, एखादी व्यक्ती  घटनेच्या कलम 62 (1)(एफ) नुसार दोषी असेल तर ती व्यक्ती आयुष्यभर दोषीच राहील. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा अर्थ असा की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आता त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणत्याही सार्वजनिक पदाचा कार्यभार सांभाळू शकणार नाहीत.     गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, घटनेच्या अनुच्छेद 62 आणि 63 नुसार दोषी ठरविण्यात आलेली कोणतीही व्यक्ती राजकीय पार्टीचे प्रमुख पद स्वीकारु शकत नाही. यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पार्टीच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार झाले होते. डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमतीने हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी निर्णयाआधी सांगितले की, जनतेला चांगली प्रतिमा असलेल्या नेत्यांची गरज आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पनामा पेपर लीक प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते. तसेच शरीफ यांच्याबरोबर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनाही अपात्र ठरवले होते.

काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण? पनामा पेपर लीक प्रकरणात पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे आरोप आहेत. काही वर्षांपूर्वी पनामा पेपर लिक झाल्याची घटना घडली होती. त्यात अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय नेत्यांची देशा बाहेर मोठी संपत्ती असल्याचे उघडकीस आले होते. त्यात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे देखील नाव सामील आहे. गेल्या वर्षी 4 एप्रिल 2016 रोजी आंतरराष्ट्रीय पत्रकांनी शरीफ यांचे नाव त्यात असल्याचे छापले होते. त्यावर पाकिस्तानात खटला चालवला गेला होता. शरीफ यांच्यारील भ्रष्टाचाराबाबात चौकशीसाठी संयुक्त तपास पथके तयार करण्यात आली होती. 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान