शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट

By संतोष कनमुसे | Updated: April 23, 2025 11:54 IST

Pahalgam Attack Update : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात काल दहशतवाद्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला.

Pahalgam Attack Update ( Marathi News ): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात काल मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था ॲक्शनमोडवर आल्या आहेत, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे बारामुल्ला परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले, हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले. दरम्यान, आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची भीती घेतली आहे. कालपासूनच पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट दिला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने गस्त वाढवला आहे.  ( Pahalgam Attack Update  )

Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून २६ जणांची हत्या केली आहे. देशाच्या विविध भागांतून काश्मीरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर लोक सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत. देशभरातून अशाच प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शनमोडवर आले आहेत. पीएम मोदी यांनी आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.  ( Pahalgam Attack Update  )

पाकिस्तानचे हवाई दल रात्रीपासूनच अलर्ट

पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकडी भीती वाटत आहे. भारतीय कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी हवाई दल रात्रभर सतर्क राहिले. फ्लाइट रडार डेटामध्ये नोंदवलेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या असामान्य हालचालींवरून हे उघड झाले आहे.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ चे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर समोर आले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये कराची येथील सदर्न एअर कमांडमधून लाहोर आणि रावळपिंडीजवळील उत्तरेकडील तळांवर उड्डाण करणारे पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख विमान दाखवण्यात आले आहे.

पाकिस्तानकडून हल्ल्यावर प्रतिक्रिया 

दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त म्हणून काम केलेले अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'वर पोस्ट केली. "मला खात्री आहे की पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही भारतीय गैरसमजुतींना रोखण्यासाठी इस्लामाबाद सर्व शक्य उपाययोजना करत आहे. मला यात काही शंका नाही की यावेळी पाकिस्तानची प्रतिक्रिया खूपच कठोर असेल." ( Pahalgam Attack Update  )

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतIndian Armyभारतीय जवान