शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:07 IST

फिलीपिन्सच्या नियंत्रणाखाली असलेल्या पगासा बेटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अवघ्या ३७ हेक्टरमध्ये पसरलेल्या या देशावर चीनची नजर आहे.

फिलीपिन्सच्या नियंत्रणाखाली असलेले पगासा हे छोटेसे बेट सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. पगासा या शब्दाचा अर्थ आहे आशा. या पगासा बेटाचा विस्तार अवघ्या ३७ हेक्टरमध्ये आहे. पगासा हे इतके लहान बेट आहे की, त्यावर अवघे ३०० लोक राहतात. या बेटावर लहान लहान लाकडी घरे आहेत. निळ्याशार पाण्यात मासेमारी करणे, आणि वाळूच्या किनाऱ्यांवर भाजीपाला पिकवणे, हा इथल्या लोकांचा अर्थार्जनाचा मार्ग आहे. मात्र, सध्या चीन या देशावर बारीक नजर ठेवून आहे. या बेटाला आपल्या अधिपत्याखाली घेण्यासाठी चीनच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. 

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पगासा बेटाच्या पश्चिमेला चीनी जहाजांची फौज तैनात करण्यात आली आहे. समुद्रावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चीनकडून नौदल, तटरक्षक दल आणि जहाजे तैनात केली गेली आहेत. गेल्या १० वर्षांत चीनने दक्षिण समुद्रात आपली उपस्थिती वाढवली आहे. चीनने समुद्रात बुडालेल्या प्रवाळ खडकांवर तीन विमानतळे बांधून अनेक जहाजे देखील तैनात केली आहेत. सागरी मार्गावर आपला दावा मजबूत करण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. पण, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स याचा तीव्र विरोध करत आहेत.

फिलीपिन्सकडून जोरदार विरोध!पगासामध्ये सामान्य लोक राहतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार या बेटावरची लोकसंख्या आणि घन जमीन आपल्या मालकीची असल्याचे फिलीपिन्सचे म्हणणे आहे. फिलीपिन्स राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहाय्यक महासंचालक जॉनथन मलाया म्हणाले की, "पगासा आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या ठिकाणी एक हवाई पट्टी आहे, आमचे लोक इथे राहतात."    

१९७१ मध्ये फिलीपिन्सने तैवानकडून हे बेट ताब्यात घेतले आणि १९७८ मध्ये ते औपचारिकपणे आपल्या ताब्यात असल्याचे घोषित केले. नंतर फिलीपिन्स सरकारने लोकांना तिथे स्थायिक होण्यास प्रोत्साहित केले. या ठिकाणी सरकार दरमहा रेशन, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू पुरवते. चार वर्षांपासून इथे वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. 

चीनची जहाजं लोकांना घाबरवतात!चीनमुळे आता इथल्या लोकांना मासेमारी करणे कठीण झाले आहे. चीनची जहाजं लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मोठमोठी जहाजं फार मोठ्या आवजातला हॉर्न वाजवून मासेमारांना पळवून लावतात, अशी आपबिती स्थानिक मच्छीमार सांगतात.

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय