शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

"आमची संस्कृती धोक्यात..."; युरोपातील 'या' देशात बांगलादेशींमुळे वाद, क्रिकेटवर बंदी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 20:56 IST

...आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे.

बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याची वेळ आली. यानंतर हा देश आता मवाल्यांचा अड्डा बनला आहे. येथे झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या निदर्शनांमागे बांगलादेशी कट्टरपंथी लोकांचा हात होता. हे कट्टरपंथी भारतविरोधी असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. यांच्यामुळेच हा एक चांगली प्रगती करत असलेला देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. 

आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे. या देशाचे नाव आहे इटली. येथील मॉनफाल्कोन (Monfalcone) या छोट्या शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे बांगलादेशी मुस्लीम मजूरांची संख्या लक्षणीय आहे. हे मजूर मोठमोठी जहाजे बनवणाऱ्या एका कंपनीत काम करतात.

या बांगलादेशी लोकांमुळे मॉनफाल्कॉन उद्ध्वस्त होत असल्याचे बोलले जात आहे. हे एक अत्यंत सुंदर शहर आहे. येथील लोक अतिशय आधुनिक आहेत. मात्र, येथील महापौर ॲना मारिया सिसिंट यांचे म्हणणे आहे की, बाहेरील लोकांमुळे आमची ओळख नष्ट होत आहे. आमची संस्कृती धोक्यात आली आहे. महापौर मारिया या उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी संबंधित आहेत.

शहराची लोकसंख्या केवळ 30 हजार -खरे तर हे एक अत्यंत छोटे शहर आहे. येथील लोकसंख्या केवळ 30 हजार एवढीच आहे. येथे 1990 च्या दशकापासून बांगलादेशी मुस्लीम कामगार येत आहेत. येथे फिनकँटियरी ही जहाज तयार करणारी सरकारी कंपनीही आहे. येथील लोकसंख्येत एकतृतियांश परदेशी मजूर आहेत.

क्रिकेटवर बंदी - बीबीसीसोबत बोलताना महापौर मारिया म्हणाल्या, परदेशी मजुरांमुळे आणची संस्कृती थोक्यात आली आहे. येथे राहणारे बांगलादेशी लोक क्रिकेट खेळतात. अशा परिस्थितीत येथे क्रिकेटवरही बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आपल्याकडे निधी नसल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे. तसेच क्रिकेटचा चेंडू अत्यंत धोकादायक असतो. यामुळे या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येथे कोणी क्रिकेट खेळताना आढळल्यास त्याला 111 डॉलर्सचा दंड भरावा लागेल.

एवढेच नाही तर, बांगलादेशी मुस्लीम लोक इटालियन लोकांमध्ये मिसळण्यास लायक नाहीत. हे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. यामुळे शहराची ओळख नष्ट होत चालली आहे, असेही मारिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :ItalyइटलीMuslimमुस्लीमBangladeshबांगलादेश