शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Oscars 2018: ऑस्करचा 'चौकार' मारणाऱ्या 'शेप ऑफ वॉटर'ची आगळीवेगळी कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 12:20 IST

शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती.

कॅलिफोर्निया: जगभरातील चित्रपटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेला 90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी कॅलिफोर्नियात पार पडला. या सोहळ्यात बहुचर्चित 'शेप ऑफ वॉटर'ने यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर आणि प्रॉडक्शन डिझाईन या विभागांमध्येही 'शेप वॉटरला ऑस्कर'ने गौरवण्यात आले. शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. यापूर्वी  'ऑल अबाउट इव', 'टायटॅनिक' आणि 'ला ला लँड' या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली होती. मात्र, 'शेप ऑफ वॉटर'ने हे विक्रम मोडीत काढल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली होती. मेक्सिकन दिग्दर्शक गिलिआर्मो डेल टोरो यांनी 'शेप ऑफ वॉटर'चे दिग्दर्शन केले आहे. एका अमेरिकन प्रयोगशाळेत काम करणारी कर्मचारी आणि अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला विचित्र प्राणी या दोन मुख्य पात्रांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला हा प्राणी माणसासारखाच चालू शकतो. पण पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असतो. सफाईच्या निमित्ताने या द्विपाद प्राण्याशी हातवाऱ्यांच्या भाषेत ओळख करून घेणारी एलिसा त्याच्याशी मैत्री करते आणि या मैत्रीमुळे तिचे आयुष्य बदलून जाते. प्रयोगशाळेचा निर्दयी मालक रिचर्ड (मायकेल शेनॉन) त्या प्राण्याला मारून टाकण्याच्या कामाला लागतो. तेव्हा एलिसा आपल्या मित्राच्या मदतीने त्याला घरी पळवून आणते आणि त्यानंतरच्या एकंदरीत घटनाक्रमाचे चित्रीकरण 'शेप ऑफ वॉटर'मध्ये करण्यात आले आहे. वेगळी मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे हा फॅण्टसीपट यंदा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, ऑस्कर नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतर या चित्रपटावर कथाचोरीचे आरोप झाले होते. परंतु, या सगळ्यावर मात करत 'शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला.

 

टॅग्स :Oscars 2018ऑस्कर अवॉर्ड्स २०१८entertainmentकरमणूक