शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

CoronaVirus बाधितांपैकी ७६ टक्के रुग्ण केवळ आठ देशांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 06:06 IST

बाधितांची संख्या १६ लाखांवर : अमेरिका, युरोपात बाधितांची संख्या अधिक

विशाल शिर्के।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-२०१९) विळखा संपूर्ण जगभर बसला असून, शुक्रवारी (दि. १०) बाधितांचा आकडा १६ लाखांवर गेला आहे. एकूण बाधितांपैकी तब्बल ७६ टक्के रुग्ण केवळ आठ देशांमध्येच आहे. त्यात प्रामुख्याने अमेरिका, स्पेन, इटली, जर्मनी, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि इराण या देशांचा समावेश होतो. बुधवारी (दि. ८) असलेल्या साडेतेरा लाख बाधितांपैकी १०,२०,८६३ रुग्ण या सात देशांत असून, ३,३२,४९८ रुग्ण उर्वरित देशांमध्ये आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी (दि. ८ एप्रिल) जाहीर केलेल्या कोरोना अहवालातून ही माहिती समोर आली आहे. बुुधवार अखेरीस जगातील कोरोना बाधितांचा आकडा १३ लाख ५३ हजार ३६१ वर गेला होता. त्यात ७६ हजार ६३९ रुग्णांची भर पडली. तसेच, मृतांचा आकडा ७९ हजार २३५ गेला होता. त्यातही नव्या ६ हजार ६९५ मृत्यूंची भर पडली. गुरुवारी दुपारपर्यंत बाधितांचा आकडा १३ लाख ९५ हजार १३६वर गेला होता. तर, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८१ हजार ५८० वर गेली होती. शुक्रवारी बाधितांचा आकडा १४ लाखांवर गेलेला असेल. स्पेन, इटली आणि जर्मनीतील बाधितांची संख्या एक लाखावर गेली असून, स्पेन आणि इटली लवकरच दीड लाखाचा टप्पा पार करेल, अशी स्थिती आहे. या तीनही देशांमध्ये ३ ते साडेपाच हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेमध्ये बाधितांच्या संख्येमध्ये अत्यंत वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी अमेरिकेतील बाधितांची संख्या ४ लाख ५४ हजारावर गेली होती. बुधवारच्या तुलनेत ३७ हजार ९४ रुग्णांची त्यात भर पडली. तसेच, मृतांचा आकडा देखील १५ हजारांच्या घरात गेला आहे. बाधितांचा आकडा लवकरच पाच लाखांचा टप्पा पार करेल, अशी स्थिती आहे.चीनमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण शंभराखालीकोरोनाचा जगभर प्रसार झालेल्या चीनमधे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे दिसून येत आहे. चीनमधे बाधितांची संख्या ८३,१५७ असून, नवीन ८६ रुग्ण आढळून आले आहेत; तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३४२ असून, त्यात नवीन मृतांची संख्या २ आहे. मात्र, चीन जाहीर करीत असलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली जात आहे. चीनने त्यावर भाष्य न करता, वुहान प्रांतातील लॉकडाऊन शिथिल करून त्यावर उत्तर दिले आहे.जपान, थायलंडने रोखला प्रसारचीननंतर सुरुवातीला बाधितांचा आकडा असणाऱ्यांमध्ये जपान, थायलंड आणि कोरियाचा समावेश होता. त्यातील जपान आणि थायलंडने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले आहे. जपानमधे ८ एप्रिलअखेरीस ४२५७ बाधित असून, ३५१ नवीन रुग्ण सापडले आहेत. मृतांचा आकडा ८१ आहे. थायलंडमधे २,३६९ रुग्ण असून, त्यात १४९ नवीन रुग्ण आहेत. तर, मृतांचा आकडा तीस आहे. भारतात ८ एप्रिलअखेरीस बाधितांची संख्या ५,७०९ झाली असून, मृतांची संख्या २१० आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या