शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

जगात दरवर्षी एक अब्ज बालकांवर होतो अत्याचार; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 00:34 IST

स्थापित रणनीतीचे पालन करण्यात बहुतांश देश अपयशी; असंख्य मुले होतात जखमी; अनेकांवर ओढवतो मृत्यू

संयुक्त राष्ट्रे : मुलांच्या सुरक्षेसाठी स्थापित रणनीतीचे पालन करण्यात जगातील बहुतांश सर्वच देशांना अपयश आले असून, त्यामुळे जगात दरवर्षी एक अब्ज मुलांवर शारीरिक, लैंगिक व मानसिक अत्याचार होतो, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात देण्यात आली आहे. यात अनेक मुले गंभीर जखमी होतात, तर अनेक मारली जातात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संयुक्तपणे जारी केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच अहवाल आहे.या अहवालात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य मुलांना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तींसोबत जबरदस्तीने राहावे लागत आहे.संयुक्त राष्ट्रांनी लहान मुलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी जागतिक स्थिती अहवाल २0२0 गुरुवारी जारी केला. या अहवालात म्हटले आहे की, जवळपास सर्वच (८८ टक्के) देशांत अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. या कायद्याची आपण सक्तीने अंमलबजावणी करीत असल्याचे मान्य करणाºया देशांची संख्या मात्र अर्ध्यापेक्षाही कमी (४७ टक्के) आहे.अहवालात म्हटले आहे की, मुलांच्या संरक्षणासाठी स्थापित रणनीतीची अंमलबजावणी करण्यात बहुतांश सर्वच देश अपयशी ठरले आहेत. त्याचा परिणाम म्हणून दरवर्षी मुलांना शारीरिक, लैंगिक आणि मानसिक हिंसेचा सामना करावा लागतो. हिंसेचा सामना करावा लागणाºया मुलांची संख्या जगात जवळपास एक अब्ज आहे.जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक तेदरोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, मुलांच्या विरोधात होणाºया हिंसेसाठी कोणत्याही प्रकारच्या सबबी सांगितल्या जाऊ शकत नाहीत. ही हिंसा रोखण्यासाठी आपल्याकडे स्थापित माध्यम आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती आम्ही सर्व देशांना करीत आहोत.युनेस्कोचे महासंचालक अँड्र्यू अ‍ॅझोले यांनी सांगितले की, कोविड-१९च्या लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या विरोधातील हिंसाचार आणि आॅनलाईन दादागिरी यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेक मुलांनी शाळा उघडल्यानंतर शाळेत जाण्याबाबत भीती व्यक्त केली आहे. मुलांसाठी शाळेत आणि घरात निर्भय वातावरण निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सरकारांनी आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात.मुले अडकली अत्याचाऱ्यांसोबतयुनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिएटा फोर यांनी सांगितले की, मुलांविरोधातील हिंसा नेहमीच व्यापक पातळीवर होत आली आहे. तथापि, आता परिस्थिती आणखी बिघडली आहे. लॉकडाऊन, बंद असलेल्या शाळा आणि दळणवळणावरील प्रतिबंध यामुळे मुले अत्याचाºयांसोबत अडकून पडली आहेत.शाळा मुलांना सुरक्षित स्थान उपलब्ध करून देतात. तथापि, लॉकडाऊनमुळे तेच त्यांच्याकडे आता उपलब्ध नाही. असंख्य मुलांना आपल्यावर अत्याचार करणाºयांसोबत नाइलाजाने राहावे लागत आहे.१५५ देशांच्या यशापयशाचा अहवालात लेखाजोखाजागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, युनेस्को, संयुक्त राष्ट्रांच्या बालविरोधी हिंसा विभागाचे विशेष प्रतिनिधी आणि एंड व्हायलन्स पार्टनरशिप या संस्थांनी एकत्रितरीत्या हा अहवाल जारी केला आहे.लहान मुलांच्या विरोधातील हिंसा रोखण्यासाठी, तसेच त्याविरुद्ध प्रतिक्रिया देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘इन्स्पायर’नामक सात रणनीती साचासंबंधी १५५ देशांनी काय प्रगती केली, याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. या देशांनी रणनीती साचाची कशी अंमलबजावणी केली, त्यात त्यांना किती यश आले, किती अपयश आले, यासंबंधीचा तपशील अहवालात आहे.अहवालात म्हटले आहे की, या रणनीतींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न आणखी वाढविण्याची गरज आहे. अहवालात पहिल्यांदाच १८ वर्षांखालील मुलांच्या नरसंहाराबाबत जागतिक अनुमान दर्शविण्यात आले आहे. मुलांच्या आरोग्याची सुरक्षा आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे. आताच नव्हे, तर भविष्यासाठीही हे आवश्यक आहे, असेही गेब्रेयसस यांनी म्हटले आहे.