शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

३८ देशांमध्ये ओमायक्राॅनने पसरले पाय; आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण, भीती मात्र डेल्टाचीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 04:59 IST

कॅनडामध्ये नव्या विषाणूचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कॅनडामध्ये ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डाेस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे

वाॅशिंग्टन : अतिशय वेगाने पसरणाऱ्या ओमायक्राॅनचा आतापर्यंत ३८ देशांमध्ये शिरकाव झाला आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेपाठाेपाठ ब्रिटन, घाना आणि नेदरलॅंड या देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतही सहा राज्यांमध्ये नवा विषाणू पाय पसरत आहे. असे असले तरी थंडीच्या दिवसांमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये डेल्टाचीच भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कॅनडामध्ये नव्या विषाणूचे १५ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कॅनडामध्ये ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डाेस देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सिंगापूर, फ्रान्स आणि मलेशियामध्येही ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत काेराेनाच्या ओमायक्राॅन व्हेरिएंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील आणखी सहा राज्यांमध्ये ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यूजर्सी, मेरीलॅंड, मिसूरी, नेब्रास्का, पेनसिल्वेनिया आणि उताह या राज्यांनी ओमायक्राॅनचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली. नेब्रास्का येथे ६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी केवळ एकाचेच लसीकरण झाले हाेते. तसेच काेणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. उताह येथील रुग्णाला ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्या जनुकीय तपासणीनंतर उघडकीस आले. मेरिलॅंडमध्ये ३, पेनसिल्वेनिया, आणि न्यूजर्सीमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. 

डेल्टाचाच जास्त धाेकाकाेणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. ओमायक्राॅनची चिंता असली तरीही वाढत्या थंडीमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा जास्त धाेका असल्याचे अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मदुराईत लोकांना लसीची किमान एक मात्रा...दक्षिण तामिळनाडूतील मदुराईत राहणाऱ्यांना कोविड-१९ विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीची किमान एक मात्रा (डोस) घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक आठवड्याचा वेळ दिला असून, त्यानंतर लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणे आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये प्रवेशाला बंदी असेल. ही घोषणा जिल्हाधिकारी अनिश शेखर यांनी केली. ते म्हणाले, “लस घेतल्याचे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनाच सार्वजनिक ठिकाणी येण्यास मुभा असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन