शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका कोणाला?; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 12:03 IST

आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान; संपूर्ण जगाची चिंता वाढली

जोहान्सबर्ग: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत ३० पट अधिक वेगानं पसरतो. व्हेरिएंटच्या म्युटेशनचा वेग काळजी वाढवणारा आहे. आफ्रिका खंडातील देशांमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांनी आफ्रिकेहून सुरू असलेली वाहतूक रोखली आहे. 

ओमिक्रॉन व्हेरिएंट कोणत्याही प्रमुख सिंड्रोमशिवाय हलक्या आजाराचं कारण ठरत असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी दिली. नव्या व्हेरिएंटमुळे हलक्या स्वरुपाचा त्रास होतो. मांसपेशींमध्ये वेदना, एक दिवस थकवा किंवा दोन दिवस ताप अशी लक्षणं दिसून येतात. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांना वास येणं बंद व्हायचं. मात्र नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांना तसा त्रास होत नाही. त्यांना हल्का कफ जाणवतो, अशी माहिती दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा एँजेलिक कोएट्रजी यांनी दिली.

नव्या रुग्णांची संख्या किती? धोका कोणाला?नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या फारशी नाही. बरेचसे ओमिक्रॉनग्रस्त घरातच उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवर फारसा ताण नाही. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगानं वाढण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. रुग्णालयात दाखल झालेले बहुतांश रुग्ण तरुण आहेत. त्यांचं वय ४० पेक्षा कमी आहे, असं कोएट्रजी यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या