शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ओमानच्या आखातात टँकरवरील संशयित हल्ल्यानंतर जागतिक बाजारात तेल महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 05:54 IST

कच्च्या तेलाच्या दरात ४.५ टक्के वाढ; पश्चिम आशियाई प्रदेशात तणाव

न्यूयॉर्क : ओमानच्या आखातात दोन तेलवाहू जहाजांवर (टँकर्स) संशयास्पद हल्ला झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत वाढ झाली आहे. तेलाने समृद्ध असलेल्या पश्चिम आशियाई प्रदेशात तणाव वाढल्याची भीती निर्माण झाल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ४.५ टक्के वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक शेअर बाजारात तेल कंपन्यांचे समभाग उसळले आहेत. अमेरिकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचा लाभही बाजारांना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओमानचे आखात होरमुजच्या सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला आहे. या जलमार्गातून किमान १५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते. याशिवाय अब्जावधी रुपयांची तेलेतर मालाची वाहतूकही येथून होते. त्यामुळे येथील अशांततेचा जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होईल. ओमानच्या आखातातील तेलवाहू जहाजावरील हल्ल्यास इराण जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत हा मुद्दा आपण उपस्थित करू, असे पॉम्पेव यांनी सांगितले. या भागातील आपल्या फौजा आणि मित्रांचे वॉशिंगटन संरक्षण करील, असा गर्भित इशाराही पॉम्पेव यांनी दिला आहे. इराणने मात्र अमेरिकेचा आरोप फेटाळला आहे. इराणचे विदेशमंत्री मोहंमद जवाद जाफरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अमेरिकेचे आरोप निराधार आहेत. तथ्ये आणि पुरावे हे न पाहताच अमेरिकेने इराणवर आरोप लावले आहेत.इराणने हटविले न फुटलेले सुरुंग?च्हल्ला झालेल्या जहाजावरील न फुटलेले सुरुंग इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’च्या जवानांनी हटविले असल्याचा आरोप अमेरिकी लष्कराने केला आहे. एका जहाजावरील सुरुंग रिव्होल्युशनरी गार्ड हटवीत असल्याचा कथित व्हिडिओही अमेरिकी लष्कराने जारी केला आहे.च्हल्ला झाला ते ठिकाण इराणी समुद्र किनाºयाजवळ आहे. हल्ल्याला बळी पडलेले एमटी फ्रन्ट आॅल्टेअर हे जहाज नॉर्वेचे असून, कोकुका करेजिअस नावाचे दुसरे जहाज जपानच्या मालकीचे आहे. स्फोटानंतर जहाजांवर आग लागली. फ्रन्ट आॅल्टेअर हे जहाज कित्येक तास जळत होते. धुराचे लोट आकाशाला भिडले असल्याचे दिसून आले.

टॅग्स :AmericaअमेरिकाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प