शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांना नाही जमलं ते ट्रम्पनी करुन दाखवलं

By admin | Updated: April 7, 2017 13:06 IST

सीरियातील हवाई तळावर हल्ला करण्याचा आदेश देऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांना जे जमले नाही ते करुन दाखवले.

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. 7 - सीरियातील हवाई तळावर हल्ला करण्याचा आदेश देऊन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांना जे जमले नाही  ते करुन दाखवले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा सीरियातील बाशर असद सरकारला विरोध होता. त्यावरुन त्यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर तीव्र मतभेदही झाले. पण त्यांनी कधी थेट सीरियन सरकारच्या विरोधात कारवाईचा निर्णय घेतला नाही. 
 
सीरियात इसिस विरोधातील लढाईत अमेरिकेचा सहभाग मर्यादीत होता. पण आता अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक राजकारण तापणार आहे. बाशर असद सरकारला रशिया आणि इराण या दोन देशांचा भक्कम पाठिंबा आहे. पण त्याचवेळी अमेरिका आणि युरोपातील प्रमुख देश असाद सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे या मुद्यावरुन जागतिक राजकारणात दोन गट पडणार असून, राजकारण अधिक तीव्र होणार आहे. 
 
यात चीनची भूमिकाही महत्वाची राहील. चीन रशियाच्या बाजूने उभा राहिल्यास पेच आणखी वाढेल. सीरियात असद सरकारने आपल्याच नागरीकांवर रासायनिक हल्ला घडवून आणला. त्यामुळे खवळलेल्या अमेरिकेने सीरियातील शायरत तळावर 50 पेक्षा जास्त क्रूझ मिसाइल डागली. 
 
सीरियन नागरीकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला गुरुवारी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.