शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकटं वाटणाऱ्यांची संख्या वाढली, इंग्लंडमध्ये आता 'एकेकट्यां'साठीचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:38 IST

बदलती शहरी जीवनशैली, आधुनिक युगातील कुटुंबपद्धती, वाढलेले जीवनमान यामुळे संपूर्ण जगात एकटेपणे जगणाऱ्यांची संख्या वाढीला लागली आहे.

लंडन- बदलती शहरी जीवनशैली, आधुनिक युगातील कुटुंबपद्धती, वाढलेले जीवनमान यामुळे संपूर्ण जगात एकटेपणे जगणाऱ्यांची संख्या वाढीला लागली आहे. या एकट्याने जगणाऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. इंग्लंडने या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी चक्क स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आधुनिक जगाचे दुःखद वास्तव असल्याचं मत इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केले आहे.मागच्या वर्षी ब्रिटिश कमिशनला इंग्लंडमध्ये नव्वद लाख लोकांना एकटेपणाचा त्रास होत असल्याचं आढळलं होतं. आपल्या समाजासमोर असणाऱ्या या एकटेपणाच्या आव्हानाला मला तोंड द्यायचं आहे. प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे आलेलं एकटेपण, वृद्धत्वामुळं किंवा कोणीही बोलण्यासाठी नसल्यामुळे आलेलं एकटेपण अशा व्यक्तींची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यात येईल, असे इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी सांगितल्याचे न्यू यॉर्क टाइम्सने वृत्त प्रसिद्ध केले आहे.या मंत्रालयाचे काम ट्रेसी क्रोच यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. एकटेपणाची समस्या जगातील बहुतांश देशांमधील नागरिकांना भेडसावत आहे. कोणत्याही समस्येपेक्षा समाजापासून अलिप्त राहण्यामुळे निर्माण होणारी समस्या वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांनी यापुर्वीच सांगितले होते. त्याचा संबंध मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगाशी असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले होते. ब्रिटनमधील वृद्ध लोकांसाठी काम करणारी सर्वात मोठी संस्था एज युकेचे प्रमुख मार्क रॉबिन्सन यांनी तर एकटेपण हे दिवसभरात 15 सिगारेट ओढण्यापेक्षाही जास्त भयंकर आहे, असे मत व्यक्त केले आहे. इंग्लंड सरकारने केलेल्या संशोधनानुसार देशातील 2 लाख लोकांनी आपले नातलग किंवा मित्रांशी महिना-महिना संपर्कात नसल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Englandइंग्लंड