शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आता सुरू झाले सूडयुद्ध! इस्रायल-अमेरिकेने ३० बॉम्ब टाकून केला इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह खामेनेईंवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:28 IST

इराणच्या हल्ल्यात इस्रायलमधील १० जण, अमेरिकेचे तीन सैनिकही ठार; इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात तेहरानमध्ये २०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

दुबई : सर्वोच्च नेते अयातोल्लाह खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणने रविवारी सूडाची शपथ घेत इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवले. या हल्ल्यात इस्रायलमधील १० जण ठार आणि १२० हून अधिक जखमी झाले असून अमेरिकेचे तीन सैनिकही ठार झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा इस्रायलमधील सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे. तर इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात तेहरानमध्ये २०० हून अधिक नागरिक ठार झाल्याचा इराणने दावा केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आखाती देशांवरही इराणचे हल्ले सुरूच राहिले तर त्यांनी कल्पना केली नसेल इतका संहारक हल्ला केला जाऊ अशी धमकी दिली आहे. दरम्यान, इराणचे नवे नेतृत्व चर्चेसाठी तयार असल्याचा दावा 'व्हाईट हाऊस'मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये ४० दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली. शनिवारी झालेल्या या हल्ल्यांमध्ये केवळ खामेनेईच नव्हे, तर इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, खामेनेई यांचा मुलगा, जावई आणि नातूदेखील मारले गेले आहेत. 

अधिक संहारक हल्ला करु : नेतन्याहूइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणने केलेल्या हल्ल्यानंतर तेहरानवरील हवाई हल्ले आगामी दिवसांत अधिक तीव्र केले जातील. इस्रायलचे सैन्य अजून पूर्ण क्षमतेने उतरलेले नाही असे एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.     

मुलींच्या शाळेवर हल्ला, १६५ जण ठारदक्षिण इराणमध्ये मुलींच्या शाळेवर हल्ला करण्यात आला. त्यात किमान १६५ जण ठार असून, डझनभर जखमी झाली असल्याची माहिती आयआरएनए या सरकारी वृत्तसंस्थेने दिली.  ओमानच्या किनारपट्टीजवळ १५ भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला. यात चार जखमी झाले. ‘स्कायलाइट’ नावाच्या जहाजावर हा हल्ला झाला.

इराणने अबू धाबीवरही हल्ले केले. सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत, बहरीन व कतार यांनी इराणने डागलेली क्षेपणास्त्रे अडविल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणच्या नौदलाची ९ जहाजे नष्ट केली. इराणच्या नौदलाचे मुख्यालयही जवळपास पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. 

भारताकडे १० ते १५ दिवसांचा तेलसाठाइराणने ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ बंद केल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असली, तरी भारताकडे १० ते १५ दिवसांचा साठा उपलब्ध आहे.

युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी माझे बोलणे झाले. युएईवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध. या कठीण काळात भारत युएईसोबत खंबीरपणे उभा आहे. युएईत राहणाऱ्या भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही प्रादेशिक शांतता, सुरक्षा व स्थिरतेसाठी कटिबद्ध आहोत. तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.नरेंद्र मोदी, पंतप्रधान

English
हिंदी सारांश
Web Title : Iran-Israel Conflict Escalates: Retaliation, Deaths, and Regional Tensions Rise

Web Summary : Following Khamenei's death, Iran vowed revenge, attacking Israel. Israel retaliated, escalating tensions. Hundreds died in Tehran. The conflict threatens regional stability, impacting global oil supply. India expresses solidarity with UAE.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल