शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

By admin | Updated: September 28, 2015 02:58 IST

आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे

सिलिकॉन व्हॅली (अमेरिका) : आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था आठ हजार अब्ज डॉलरची आहे आणि आम्हाला ती २० हजार अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आहे. त्याकरिता आम्हाला कृषी, सेवा आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया फेसबुक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लाईव्ह चॅट’ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश असे की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारताकडे पाहण्याचा विश्वाचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. प्रशासनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे पारदर्शकता, उपयुक्ततता आणि सहजपणे लोकांची कामे करता आली पाहिजे. त्याकरिता निधीची कमतरता नाही, कारण की अनेक देशांकडे अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे. त्यांनी या निधीची भारतात गुंतवणूक करावी, असे मोदी यांनी आवाहन केले.मेक इन इंडियाबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले की, भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये परिवर्तन येण्याकरिता वेळ लागत असतो. ४० वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या माध्यमातून देशातील गरिबांना आर्थिक सोर्इंचा लाभ मिळावा, असा उद्देश होता. मात्र त्यानंतरही ६० टक्के लोकांकडे बँक खाते नव्हते. परंतु आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांमध्ये १४ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली. मेक इन इंडियाचे यश हे प्रत्येक व्यक्ती स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छितो. जर हे काम भारतात कमी खर्चात होत असेल तर जगातील लोक तिकडे जातील. आमच्याकडे कुशल कारागीर आणि कच्चा माल आहे. हीच मेक इन इंडियाच्या यशाची हमी आहे.मोदी म्हणाले की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारतात अमेरिकतेतून ८७ टक्के एफडीआय वाढ झाली आहे. तसेच संस्थागत गुंतवणुकीतदेखील ४० टक्के वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये घसरण सुरू असताना भारतात ही स्थिती निर्माण झाली आहे. मेक इन इंडियाच्या यशस्वीतेकरिता आमच्याकडे तरुणांची शक्ती, सशक्त लोकशाही आणि मोठी ग्राहक संख्या आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.ते म्हणाले की, जेव्हा मी इंटरनेट सोशल मीडियाशी जोडल्या गेलो, त्यावेळी त्याच्या शक्तीबाबत अंदाज नव्हता. सत्तेवर आल्यानंतर सोशल मीडियामुळे कामे सहज शक्य होऊ लागली. सोशल मीडियाचे वैशिष्ट्य असे की, तुम्ही ज्या प्रकारचे आहात, त्याप्रमाणे तुमचा सोशल मीडिया स्वीकार करीत असतो. त्याकरिता तुम्हाला स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज नाही. सोशल मीडिया आजच्या घटकेला लोकशाहीचे सामर्थ्य बनला आहे. पूर्वी ज्या कामाकरिता अनेक दिवस लागत असत, ती कामे आता सेकंदामध्ये होऊ लागली आहेत.मोदी पुढे म्हणाले की, सोशल मीडियाने प्रशासनातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.