शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

आता पंतप्रधान, मंत्री घेणार नाहीत पगार, आर्थिक स्थिती ढासळल्याने पाकिस्तान सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 06:39 IST

Pakistan Economy: पाकिस्तानमधील कोणत्याही सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’चा वापर केला जाणार नाही. आता केवळ परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठीच हा लाल गालिचा घातला जाणार आहे. देशाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील कोणत्याही सरकारी कार्यक्रमात ‘रेड कार्पेट’चा वापर केला जाणार नाही. आता केवळ परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठीच हा लाल गालिचा घातला जाणार आहे. देशाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांना अधिकृत कार्यक्रमांमध्ये रेड कार्पेट वापरण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेड कार्पेट अंथरण्याच्या पद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय त्यांनी पंतप्रधानांना दिले जाणारे वेतनही नाकारले आहे. 

१८ दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनीही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर कॅबिनेट मंत्र्यांनीही पगार न घेण्याची घोषणा केली आहे. यातून आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.

पाक पंतप्रधानांना  किती मिळतो पगार?पाकिस्ताच्या पंतप्रधानांचे वेतन दरमहा २ लाख रुपये आहे. त्याच वेळी माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना दरमहा सुमारे ८ लाख ४६ हजार पाकिस्तानी रुपये वेतन मिळत होते. हे वेतन २०१८ मध्ये संसदेने ठरवले होते. 

हा निर्णय कशासाठी?देशाचा परकीय चलनाचा साठा सध्या ८ अब्ज डॉलर इतका आहे, जो सुमारे दीड महिन्याच्या वस्तूंच्या आयातीइतका आहे. देशाकडे किमान ३ महिने माल आयात करण्याइतका पैसा असला पाहिजे.२०२४ मध्ये पाकिस्तानचा जीडीपी केवळ २.१ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. कमकुवत सरकार सत्तेवर आल्यास विकासाचा हा दर आणखी खाली जाऊ शकतो. सध्या एका डॉलरची किंमत २७६ पाकिस्तानी रुपयांएवढी आहे. जानेवारी २०२२ मध्ये, पाकिस्तानी रुपयाचे मूल्य १ डॉलरच्या तुलनेत १७४ होते, जे मेपर्यंत २०४ पर्यंत वाढले होते.

...तर पाकिस्तान होईल दिवाळखोरnपरकीय चलनाच्या घटत्या गंगाजळीत पाकला पुढील २ महिन्यांत १ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८.३० हजार कोटी रुपयांचे कर्ज फेडावे लागणार आहे. nआयएमएफचे ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळवण्याची १२ एप्रिल ही मुदतही संपुष्टात येत आहे. कर्ज न मिळाल्यास देश दिवाळखोर घोषित होऊ शकतो.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था