शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता खालिदा झिया यांनीही बांगलादेश सोडला? कतारच्या शेखचे विमान आले, घेऊन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:27 IST

बांगलादेश आता कट्टरतावादाकडे झुकू लागला आहे. अशातच दोन्ही वरिष्ठ नेत्या देशाबाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बांगलादेशाचे पंतप्रधान पद सोडावे लागलेल्या शेख हसिना भारतात शरण घेत असताना त्यांच्या कट्टर विरोधक खालिदा झिया यांनी बांगलादेश सोडल्याने खळबळ उडाली आहे. कतारच्या शेखने विमान पाठवून त्यांना लंडनला नेले आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिर झालेल्या बांगलादेशमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

बांगलादेश आता कट्टरतावादाकडे झुकू लागला आहे. अशातच दोन्ही वरिष्ठ नेत्या देशाबाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हसिना यांची सत्ता येताच तीन वेळा पंतप्रधान राहिलेस्या खालिदा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगात पाठविण्यात आले होते. हसिना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आलेल्या काळजीवाहू सरकारने खालिदा यांची सुटका केली होती. त्यांना १७ वर्षांची शिक्षा झाली होती. खालिदा यांचा पक्ष पाकिस्तानचा समर्थक आहे. यूनुस सरकारनेही पाकिस्तानशी सलगी वाढविण्यास सुरुवात केली आहे. खालिदा यांच्यावरील गुन्ह्यांवर मंगळवारी सुनावणी होत होती. याचवेळी त्या लंडनला रवाना झाल्या. 

बांगलादेशमध्ये डिसेंबर किंवा २०२६ च्या सुरुवातीला निवडणूक घेतली जाणार आहे. यामुळे दोन्ही प्रमुख नेत्या देशात नसल्याने त्यांच्या पक्षांवर याचा परिणाम होणार आहे. शेख हसिना यांचे परत जाणे कठीण आहे. परंतू, खालिदा या परत येऊ शकतात. खालिदा देशाबाहेर गेल्याचे वेगळे अर्थ लावू नयेत असे त्यांच्या पक्षाने म्हटले आहे. खालिदा या उपचारासाठी परदेशात गेल्या असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

खालिदा यांना नेण्यासाठी बांगलादेशच्या विमानतळावर कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमद बिन खलीफा अल थानी यांनी खास एअर अँबुलन्स पाठविली होती. यात बसून त्या लंडनला गेल्या आहेत. खालिदा यांच्या डॉक्टरांनुसार त्यांना लीव्हर सिरोसिस, हृदयरोग आणि किडनीशी संबंधीत समस्या आहेत. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश