शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी लष्कराबाबत टिप्पणी करणाऱ्यांवर आता गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:30 IST

पाकिस्तानच्या ११ विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटने (पीडीएम) मागील काही महिन्यांपासून देशाच्या लष्करावर राजकीय प्रकरणांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये निदर्शने करणाऱ्या विरोधी पक्षांना कडक इशारा देताना गृहमंत्री शेख राशीद अहमद यांनी म्हटले आहे की, देशाच्या लष्कराबाबत अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर ७२ तासांत गुन्हे दाखल करण्यात येतील.

पाकिस्तानच्या ११ विरोधी पक्षांची आघाडी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटने (पीडीएम) मागील काही महिन्यांपासून देशाच्या लष्करावर राजकीय प्रकरणांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप केला होता. पीडीएमचा आरोप आहे की, सैन्य दलाने २०१८ मध्ये गैरप्रकार झालेल्या निवडणुकीत कळसूत्री पंतप्रधान इम्रान खान यांना पदावर बसविले आहे.

विरोधकांचे आरोप सरकार कायम फेटाळत असून, आता गृहमंत्र्यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. देश आणि सरकारी संस्थांच्या विरोधातील दुष्प्रचार खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एक दिवस आधीच पीडीएम प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी म्हटले आहे की, सशस्त्र दलांनी देशाला बंधक बनविले आहे.पाकिस्तानी सरकार आणि विरोधक यांच्यात मागील काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. इम्रान खान यांचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, ते उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्याची हाक विरोधी पक्षांच्या आघाडीने दिली आहे. यावर सरकारने म्हटले आहे की, तुम्हाला सरकार उलथवून टाकायचे असेल तर संसदेत या तेथे चर्चा करू. लोकशाहीत सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी संसदेत चर्चा करणे योग्य राहील. हिंमत असेल तुम्ही सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करा, आम्ही पाहून घेऊ,  असे आव्हानही त्यांना सरकारने दिले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान