शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

आता तुटलेले दात नैसर्गिकरीत्या परत येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:45 IST

जपानच्या शास्त्रज्ञांची कमाल

टोकियो : अनेकदा खेळताना किंवा अपघातात आपले दात तुटून जातात. त्या ठिकाणी नवे दात येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता एका औषधामुळे नवीन दात येण्यास मदत होणार आहे. हे असे पहिलेच औषध असेल ज्याने नैसर्गिक स्वरूपात दात येतील. जपानचे संशोधक या औषधावर काम करत आहेत. सर्व वयोगटातील लोकांवर हे औषध प्रभावी ठरेल असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. ज्या लोकांचे दात खराब झाले आहेत त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे.

जपान टाइम्स वृत्तानुसार, हे औषध क्योटो विद्यापीठाच्या टोरेगेम बायोफार्मामध्ये विकसित केले जात आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये शास्त्रज्ञ त्याची चाचणी घेतील. चाचणी यशस्वी झाल्यास २०३० पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होईल. मानव व प्राण्यांना दातांच्या समान बड्स असतात. यामुळे मुलांमध्ये नवीन दात तयार करण्याची क्षमता असते. वयानुसार, बड्स विकसित होत नाहीत व शेवटी संपून जातात. बायोफार्माने यासंदर्भात अँटिबॉडी औषध विकसित केले आहे. हे औषध दातांच्या बड्स विकसित होण्यास अडथळा ठरणाऱ्या प्रथिनांना रोखून धरते.

प्राण्यांवर यशस्वी प्रयोग२०१८ मध्ये, शास्त्रज्ञांनी फेरेट या मुंगूस प्रजातीच्या प्राण्याला अँटिबॉडी औषध दिले होते. यामुळे नवीन दात यशस्वीपणे विकसित झाले. माणसांप्रमाणेच, फेरेटचे दातही लहानपणी पडतात आणि नंतर नव्याने येतात.

दात पडल्याने काय होते?चाचणीचा भाग म्हणून मुलांना दातांच्या विकासाला चालना देण्यासाठी इंजेक्शन दिली जातील. टोरेजेम बायोफार्माचे सहसंस्थापक आणि ओसाका येथील किटानो हॉस्पिटलमधील दंतचिकित्सक कात्सु ताकाहाशी यांनी सांगितले की, मुलाचे दात पडल्यामुळे त्याच्या जबड्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. अशा समस्या सोडवण्यात हे औषध महत्त्वाची भूमिका बजावेल.

टॅग्स :doctorडॉक्टरJapanजपान