शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्समध्ये 800 वर्षं जुना प्रसिद्ध चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 01:21 IST

फ्रान्समधील सर्वात जुनं आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चमध्ये आग लागली आहे.

पॅरिस- फ्रान्समधील सर्वात जुनं आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चमध्ये आग लागली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी चर्चची पूर्ण इमारत सापडली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या चर्चचं नूतनीकरण सुरू होतं. त्यामुळेच ही आग लागली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही चर्चची इमारत 850 वर्षं जुनी आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आगीमुळे चर्चचं छत पूर्णतः कोसळलं आहे. गेल्या वर्षी हेच चर्च वाचवण्यासाठी लोकांना आर्थिक मदतीचं आवाहनही करण्यात आलं होतं.

चर्चची इमारत फारच जुनी असल्याकारणानं मोडकळीस आली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते म्हणाले, सर्वच ख्रिश्चन लोकांबरोबर आमच्या संवेदना जोडलेल्या आहेत. या दुर्घटनेमुळे मला अतीव दुःख झालं आहे. मी पूर्ण देशवासीयांच्या वतीनं आज दुःखी आहे. मला हे चित्र पाहून फारच त्रास होतोय. आपला एक भाग आगीच्या विळख्यात सापडला आहे.नोट्र-डाम कॅथेड्रल या चर्चला आग लागल्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. चर्चच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, तिथे आता काहीही शिल्लक नाही. फक्त आता चर्चचा गाभा शाबूत आहेत की नाही त्याचीच चिंता सतावते आहे.
पॅरिसच्या महापौरही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, ही आग भयंकर आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांनी आगीच्या जवळपासच्या परिसरात जाऊ नये.हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा मारून आगीवर नियंत्रण मिळवा, असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्स