शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी

By admin | Updated: January 6, 2016 12:52 IST

उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी पहिल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली असून आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

ऑनलाइन लोकमत
प्याँगयाँग (उत्तर कोरिया), दि. ६ - उत्तर कोरियाने बुधवारी सकाळी विध्वंसक अशा हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतल्याचा दावा केला असून आण्विक शस्त्र निर्मितीच्या दृष्टीने उत्तर कोरियाचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी १० वाजता पेइचिंग येथील केंद्रावर ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान ज्या भागात ही चाचणी घेण्यात आली तेथे बॉम्बच्या स्फोटामुळे भूकंप झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या भौगोलिक सर्वेक्षण संस्थेच्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील काही परिसर ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्क्यांनी हादरला. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली त्या पंगेयेरी या ठिकाणापासून भूकंप झालेला परिसर अवघ्या ४९ किलोमीटर अंतरावर असून हा मानवनिर्मित भूकंप असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. दक्षिण कोरिया व जपाननेही हे धक्के भूकंपामुळे नव्हे तर हायड्रोजन बॉम्बच्या चाचणी केल्यामुळे बसल्याचा दावा केला होता. अखेर उत्तर कोरियाने बुधवारी चाचणी घेतल्याचे स्पष्ट केल्यानंतर द.कोरिया व जपानची शंका खरी ठरली. यापूर्वी उत्तर कोरियाने २००६,२००९  व २०१३ अशी तीन वेळा अणुचाचणी घेतली होती आणि आज त्यांनी चौथी यशस्वी चाचणी घेतली. 
दरम्यान या चाचणीमुळे इतर देशांच्या चिंता वाढल्या असून आता उत्तर कोरियावर अमेरिकेसह इतर देशांकडून पुन्हा नव्याने निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. जर उत्तर कोरियाने आण्विक चाचणी केली असेल तर ते संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. तर जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनीही या चाचणीचा निषेध केला असून हा अतिशय गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या या चाचणीनंतर संयुक्त राष्ट्राने तातडीने बैठक बोलावली आहे.