शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अफवांना पूर्णविराम; किम जोंग उन २० दिवसांनंतर जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 08:14 IST

११ एप्रिलनंतर न दिसलेल्या किम जोंग उन यांची एका उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी

प्योंगयांग: उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र शुक्रवारी ते जगासमोर आले. गेल्या २० दिवसांपासून ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल वृत्त येत होतं. मात्र अखेर २० दिवसांनंतर ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची बातमी उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं (केसीएनए) दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन सुनचिओनमध्ये एका खतं निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगपासून जवळ आहे. यावेळी किम यांची बहिणदेखील उपस्थित होती. किम यांच्यानंतर त्यांच्या बहिणीकडे देशाची सूत्रं जाऊ शकतात, अशीदेखील चर्चा गेल्या काही दिवसांत जागतिक माध्यमांमध्ये सुरू होती.हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. तर किम यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उत्तर कोरिया प्रशासनाकडून देण्यात येत होती. मात्र किम गेल्या २० दिवसांपासून जगासमोर न आल्यानं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. ११ एप्रिलपासून किम जगासमोर आले नव्हते. उत्तर कोरियामध्ये किम यांची हुकूमशाही राजवट असल्यानं अनेक गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीबद्दलची खात्रीलायक माहिती पुढे येत नव्हती. उत्तर कोरियातल्या वर्तमानपत्रांनी ११ एप्रिल रोजी किम यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं कोणतंही छायाचित्र जगासमोर आलं नाही. या दिवसांत त्यांच्या प्रकृतीबद्दलचं वृत्त जागतिक माध्यमांनी दिलं होतं. मात्र याबद्दल उत्तर कोरियाच्या माध्यमांनी कोणतंही वृत्त दिलं नाही.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उन