शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

जपानच्या चिंतेत वाढ, उत्तर कोरियानं पुन्हा डागल्या दोन मिसाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 8:56 PM

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइलचं परीक्षण घेतलं आहे.

सेऊल- उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइलचं परीक्षण घेतलं आहे. दक्षिण कोरियानं उत्तर कोरियावर जवळच्या टप्प्यातल्या (शॉर्ट रेंजच्या) दोन बॅलिस्टिक मिसाइलची चाचणी घेतल्याचा आरोप केला आहे. उत्तर कोरिया लागोपाठ स्वतःचा शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत असून, त्यांनी आपल्या भागात होणाऱ्या हालचालींवरही निगराणी ठेवण्यात सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाच्या दाव्यानुसार या मिसाइल्स 270 ते 420 किमी दूरपर्यंत मारा करू शकतात.दक्षिण कोरिया आणि अमेरिकेची सेना संयुक्तरीत्या याचं विश्लेषण करत आहेत. उत्तर कोरियानं पुन्हा मिसाइलचं परीक्षण सुरू केल्यानं कोरियन द्वीपकल्पात पुन्हा तणाव वाढू शकतो. अमेरिकेबरोबर झालेली आण्विक चर्चा फिस्कटल्यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशाह किंग जोंग ऊन वारंवार मिसाइलचं परीक्षण करत आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयानंही उत्तर कोरियानं मिसाइलचं परीक्षण केल्याची पुष्टी केली आहे. परंतु कोणतीही मिसाइल आमच्या भागात पडली नसल्याचाही खुलासा केला आहे.जपानच्या सुरक्षेला सध्या कोणताही धोका नाही, असंही जपानकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या दाव्यानुसार, उत्तर कोरियाची बॅलेस्टिक मिसाइल त्यांच्या लष्कराचं तळ असलेल्या सिनोरीवर पडली आहे. तर दुसरी मिसाइल कुसाँगवर डागण्यात आली आङे. कुसाँग भूभागात उत्तर कोरियानं अनेक मिसाइल परीक्षण केलेले आहेत.