शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाच्या वादात चीन आमच्यासोबत- डोनाल्ड ट्रम्प

By admin | Updated: April 30, 2017 08:37 IST

उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चीन आमच्यासोबत असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 30 - उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर चीन आमच्यासोबत असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळल्यास 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतील मीडियावरही निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी चीनबाबत नरमाईची भूमिका घेत उत्तर कोरियाच्या प्रश्नावर चीन सहकार्य करत असल्याचंही सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील मीडियाच्या मेजवानीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. 1981नंतर ट्रम्प हे असे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांनी मीडिया मेजवानी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. पेन्सिलवेनियातील एका रॅलीमध्ये ट्रम्प यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळातील कामकाजाची जनतेला माहिती दिली. मात्र या भाषणात ट्रम्प यांनी जास्त करून अमेरिकी मीडियावरच टीका केली आहे. यावेळी काही जणांनी ट्रम्प यांचं पत्रकारांवर टीका करण्याच्या भूमिकेचं समर्थनही केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील करात मोठी कपात केली आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच अमेरिकेतून इतर देशांत गेलेल्या कंपन्या अमेरिकेत पुन्हा येऊन अमेरिकेच्या रोजगारात भर पडणार आहे. ट्रम्प म्हणाले, सर्वांनी आता घरी जाऊन निवांत झोपा. आम्ही कोणत्याही परिस्थिती मॅक्सिकोची भिंत बनवणार आहोत. ट्रम्प यांना मॅक्सिकोमध्ये भिंत उभारण्यासाठी कोणाकडूनही मदत मिळत नाही आहे. त्यामुळे ते 62 मैलांची लांब भिंत बांधण्यासाठी काँग्रेसच्या निधीचा उपयोग करण्याच्या विचारात आहेत.