शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

...तर उत्तर कोरियातील नागरिकांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा! हुकूमशहा किम जोंगची सटकली, काढला नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 12:39 IST

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे.

प्‍योंगयांग - उत्‍तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन (kim jong un ) यांने नुकताच एक नवा कायदा आणला आहे. या कायद्यात, उत्‍तर कोरियातील परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्यास मृत्यूदंडापासून ते कारागृहापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंड दिला होता. (North korea kim jong un is waging war on slang jeans and foreign films)

यून मि सो त्यावेळी 11 वर्षांची होती तेव्हा उत्‍तर कोरियन व्‍यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता. त्यावेळी, त्याच्या शेजाऱ्यांनाही या मृत्यूदंडाची संपूर्ण प्रक्रिया पाहण्याचा आदेश देण्यात आला होता. सो ने बीबीसी सोबत बोलताना सांगितले, की जर तुम्ही ही मृत्यूदंडाची शिक्षा पाहिली नाही, तर तो राजद्रोह मानला जाईल. एवढेच नाही, तर अश्‍लिल व्हिडिओची तस्‍करी करून आणण्याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते, असेही उत्तर कोरियाचे सैनिक स्पष्ट करत होते.

घरात पॉर्न बघत होता मुलगा, हुकूमशहा किम जोंग उनने पूर्ण परिवाराला सुनावली शिक्षा!

सो म्हणाली,  हे पाहणे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. उत्‍तर कोरियाच्या सैनिकांनी त्या व्यक्तीला गोळी घातली होती. आपण कल्पना करा, की एक असा देश जेथे सरकारकडून सातत्याने लॉकडॉउन लावला जातो आणि इंटरनेटही नसते. तेथे कुठल्याही प्रकारचा सोशल मिडिया नाही. केवळ काही सरकारी टीव्ही चॅनलच आहेत. या चॅनल्सवर केवळ, देशातील नेत्यांना आपल्याकडून काय ऐकण्याची इच्छा आहे, हेच सांगितले जाते. अशी स्थिती उत्तर कोरीयाची आहे.

मीडिया सामग्री आढळल्यास फाशीची शिक्षा -आता किम जोंग उन प्रशासनाने 'प्रतिक्रियात्मक' विचारांविरूद्ध नवा कायदा तयार केला आहे. जर, दक्षिण कोरिया, अमेरिका अथवा जपानच्या मिडिया सामग्रीसह कुणी आढळून आले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. एवढेच नाही, तर हे पाहतांना जे कुणी पकडले जाईल त्याला 15 वर्षांचा कारावास होऊ शकतो. तसेच, देशातील यूथ लीगने तरुणांतील समाजवादविरोधी विचारसरणीविरोधात अॅक्‍शन घ्यावी, असेही किम याने नुकतेच एक पत्र लिहून म्हटले होते.

किम जोंग उनची पत्नी गेल्या एक वर्षापासून गायब? लोक विचारू लागले आहेत प्रश्न....

तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे. हे घातक विष असल्याचे त्याने म्हटले आहे.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरिया