किम जोंग उनची पत्नी गेल्या एक वर्षापासून गायब? लोक विचारू लागले आहेत प्रश्न....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:14 PM2021-02-01T14:14:25+5:302021-02-01T14:22:53+5:30

एक वर्ष झाल्यानंतरही रि सोल-जूबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने स्थानिक मीडियात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची पत्नी रि सोल-जू गेल्या एक वर्षापेक्षाही अधिक काळापासून कुणाच्याही नजरेस पडली नाही. ती अखेरची २५ फेब्रुवारी २०२० ला पतीसोबत प्योंगयॅंगमध्ये ल्यूनर न्यू इअर परफॉर्मन्सवेळी दिसली होती.

किम जोंग उन यादरम्यान आपली ७४ वर्षी किम क्योंग ह्युईजवळ बसलेला दिसला होता. ती किमला उत्तर कोरियाची सत्ता मिळवून देण्यासाठी मदत केल्यावर ६ वर्षांपर्यंत गायब राहिली होती.

एक वर्ष झाल्यानंतरही रि सोल-जूबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने स्थानिक मीडियात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अनेक प्रकारच्या अफवाही पसरल्या आहेत की किम जोंग उनने पत्नीची हत्या केली.

किम जोंग उन अशाप्रकारच्या निर्णयांसाठी ओळखला जातो. २०१३ मध्ये त्याने काकू किम क्योंग ह्युईचे ६७ वर्षीय पती जांग सॉंगची हत्या केली होती.

एनके न्यूजनुसार, रि सोल-जू गायब असण्याचं कारण कोरोना व्हायरसही असू शकतं. कोरिया इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल यूनिफिकेशनचे डायरेक्टर होंग मिन यांनीही याचं समर्थन केलं आहे.

रिपोर्टनुसार, कोरोना महामारीमुळे सार्वजनिक समारोहात जाऊन रि सोल-जू आपल्या परिवारासाठी अडचण निर्माण करणार नाहीत. स्वत: किम जोंग उन २०२० मध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी दिसून आले.

दरम्यान, रि सोल-जू च्या पर्सनल लाइफबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. रिपोर्टनुसार, तिने किम सुन्ग युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच तिने उत्तर कोरियाची राजधानीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर चीनला जाऊन गाणं शिकली. रि सोल-जू ला एका परफॉर्मन्स दरम्यान किम जोंग उनने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं.

यातून हे स्पष्ट होतं की, किम जोंग उन सध्या ते एक सामान्य लीडर दाखवण्याचा प्रत्न करत नाहीयेत जे पत्नीला सोबत घेऊन कार्यक्रमाला जातात. मला वाटतं त्यांचा फोकस सध्या उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था चांगली करण्यावर आहे.

पण काही रिपोर्ट असेही आहेत की ज्यात म्हटलं गेलं की, दोघांनी तीन वर्षांआधी २००९ मध्ये लग्न केलं होतं. रि सोलू -जू आणि किमला तीन मुलं आहेत. पण उत्तर कोरियाने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.

क्युंगनॅम यूनिव्हर्सिटीमध्ये उत्तर कोरियाचा अभ्यास करणारे एका प्राध्यापक म्हणाले की, गेल्या एक वर्षात किम जोंग उनसोबत त्यांची पत्नी दिसली नाही.

यातून हे स्पष्ट होतं की, किम जोंग उन सध्या ते एक सामान्य लीडर दाखवण्याचा प्रत्न करत नाहीयेत जे पत्नीला सोबत घेऊन कार्यक्रमाला जातात. मला वाटतं त्यांचा फोकस सध्या उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था चांगली करण्यावर आहे.

Read in English