शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत उत्तर टेक्सासमध्ये एका घरामध्ये गोळीबार, आठ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 10:17 IST

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानो येथील एका घरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आठ जण ठार झाले.

ठळक मुद्देपहिला अधिकारी घरात घुसल्यानंतर त्याचा संशियत हल्लेखोराबरोबर सामना झाला

टेक्सास, दि. 11 - अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील प्लानो येथील एका घरात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आठ जण ठार झाले असून, मृतांमध्ये संशयित हल्लेखोराचाही समावेश आहे. उत्तर टेक्सासमध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास हा गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी लगेचच गोळीबाराला प्रत्युत्तर दिले असे प्लानो पोलीस दलाचे प्रवक्ते डेव्हीड टिल्ये यांनी सांगितले. पहिला अधिकारी घरात घुसल्यानंतर त्याचा संशियत हल्लेखोराबरोबर सामना झाला. अधिका-याने केलेल्या गोळीबारात संशयित हल्लेखोर ठार झाला. दोन जण जखमी झाले आहेत अशी माहिती टिल्ये यांनी दिली. जखमींच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची तसेच हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे ? ते पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पोलिसांचा तपास सुरु आहे. मृत आणि जखमींमध्ये कोणीही अल्पवयीन नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्लानो शहरासाठी अशा प्रकारचा गोळीबार नवीन आहे. कारण यापूर्वी  शहराने इतका भयानक गोळीबार अनुभवलेला नाही असे टिल्ये यांनी सांगितले. अमेरिकेत मागच्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निष्पाप नागरीक, लहान मुलांनी आपले प्राण गमावले आहेत.