शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोबेल पुरस्कार विजेते लेखक व्ही.एस. नायपॉल कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:30 IST

नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली

लंडन - नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. नायपॉल यांच्या कुटुबीयांकडून शनिवारी त्यांच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. नायपॉल यांच्या कामगिरी महान असून त्यांनी शेवटच्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रियजनांसमोरच अखेरचा श्वास घेतला, असे नायपॉल यांच्या पत्नीने म्हटले आहे. नायपॉल यांचे जीवनात अनेक आश्चर्यजनक बाबी घडल्या असून ते वळणावळाचे होते, असेही त्यांनी म्हटले.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. सन 2001 साली त्यांना साहित्याचानोबेल पुरस्कार देण्यात आला. विद्याधर यांचा जन्म त्रिनिनाद येथे झाला होता, तर त्यांचे वडिल एक प्रशासकीय अधिकारी होते. 'अ हाउस फॉर मिस्टर बिस्वास' ही त्यांच्या साहित्यातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांचे अर्धआत्मचरित्रच आहे. कॅरेबियाई देशांमध्ये आलेल्या भारतीय प्रवाशांचे वर्णन या पुस्तकात आहे. भारतीय प्रवाशांचा कॅरेबियाई देशात मिसळलेला आपलेपणा आणि तेथील संस्कृतीशी झालेला जिव्हाळा, याचे वर्णन या पुस्तकात आहे. 

कोण होते नायपॉल?

-नायपॉल यांचा जन्म त्रिनिनाद येथे १७ आॅगस्ट १९३२ रोजी एका भारतीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते. नायपॉल यांचे आजोबा मजूर म्हणून त्रिनिदाद येथे आले होते.-आॅक्सफर्ड येथील महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवीशिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मिळाल्यानंतर वयाच्या १८ वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले व पुढे त्याच देशात स्थायिक झाले.- नायपॉल हे पॅट्रिशिया अ‍ॅन हॅले हिच्याशी १९५५ साली विवाहबद्ध झाले. तिच्या मृत्यूनंतर त्यांनी १९९६ साली पाकिस्तानी पत्रकार नादिरा खानम अल्वी हिच्याशी दुसरा विवाह केला.

एक महान लेखक हरपलाइतिहास, संस्कृती, वसाहतवाद, राजकारण व अन्य विषयांचे सखोल दर्शन आपल्या साहित्यकृतींतून नायपॉल यांनी घडविले. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील एक महान लेखक हरपला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

वडीलबंधूला गमावलेसाहित्य, राजकारण अशा अनेक गोष्टींबद्दल आमचे मतभेद होते, पण त्यांच्या निधनाने वडीलबंधू गमावल्याचे दु:ख मला झाले आहे.- सलमान रश्दी,प्रख्यात लेखक

नायपॉल हे मनस्वी लेखक होते. - रामचंद्र गुहा, इतिहासकार

नायपॉल यांना कधीही भेटलो नाही मात्र त्यांच्या पुस्तकांचे अक्षरश: पारायण केले आहे. त्यांच्या लेखनाने केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. - सुकेतु मेहता, लेखक

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारliteratureसाहित्य